नव वर्षाच्या स्वागतासाठी जम्मूतील विद्यार्थी डोंबिवलीत

 


डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष असून स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मू मधून  १५ मुले दाखल झाली आहेत. मंगळवारी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात त्यांनी संस्कार भारती रांगोळीचे प्रशिक्षण घेतले. सायंकाळी भागशाळा मैदान येथे विद्यार्थ्यांनी जम्मू काश्मीर येथील पारंपारिक नृत्य  सादर केले.

      'हम' या संस्थेतर्फे दोन वर्षापूर्वी काही जम्मू काश्मिरी विद्यार्थी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर कोरोनामुळे या उपक्रमात खंड पडला. यावर्षी स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष आहे. आपल्या संस्कृतीची आदान प्रदान व्हावी यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी हाती घेतला आहे. संस्कार भारतीचे डोंबिवलीकर कलाकार उमेश पांचाळ यांनी माहिती दिली., 'हम' संस्थेच्या नंदिनी पित्रे म्हणाल्या, 3 मुलं तर 12 मुली काश्मीरहून आले. 

 हे सर्व विद्यार्थी जम्मू येथील कीलंबी पंकजा वल्ली यांच्या आदिती प्रतिष्ठान वसतिगृहातील आहेत.यावेळी काश्मिरच्या प्रियांकाने आम्हाला इथे आल्यानंतर खूप शिकायला मिळाल्याचे सांगितले. शंख, कमळ, ओम, श्री, अशा, सर्प रेषा असे रांगोळीचे प्रकार त्यांना शिकविण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post