डोंबिवली / शंकर जाधव : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी शालेय उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या.या सर्व वस्तू गरीब गरजू मुलांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.
शिवसैनिकांनी वह्या, पेन,स्केच पेन,रंग पेट्या वगैरे शालेय उपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणात भेट म्हणून जमा केल्या. शहरप्रमुख खामकर यांनी शिवसैनिकांनी आभार मानत अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आमच्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते करतील असा विश्वास खामकर यांनी व्यक्त केला.