एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा

 


 १५ दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा

डोंबिवली/  शंकर जाधव :  २७ गाव पाणी टंचाईने त्रस्त असताना डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी विभागातील नागरीका गेल्या १५ दिवसांपासून पाणी समस्येशी तोंड देत आहेत. काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी एमआयडीसी डोंबिवली विभागीय कार्यालयात धडक मोर्चा काढला.मात्र अजून दोन महिने तरी पाणी पुरवठा सुरळीत होण्यास लागणार असून पाण्याचा दाब वाढविला जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.   

   एमआयडीसी मधील मिलापनगर-सुदर्शन नगर मधील रहिवाश्यांनी एमआयडीस कार्यालयात मोर्चा काढला.येथील पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंता विजय धामापुरकर यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशच्या पदाधिकाऱ्यांनी येथील रहिवाश्यांच्या सह्यांचे निवेदन धामापुरकर यांना दिले. मोर्च्यात याप्रसंगी मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्षा वर्षा महाडिक, अरुण जोशी, आनंद दामले, राजु नलावडे, मुकुंद देव, विश्राम परांजपे, मिलिंद जोशी, संजय चव्हाण, सचिन माने, अविनाश दुसाने, संजय वणी, वनिता कोरगांवकर, महेश साठम, संजय मोघे, निवृत्ती गावकर, समीर गोखले, शिल्पा भोर, राजश्री देशमुख, राजेंद्र नांदेडकर यासह अनेक रहिवाशी सहभागी झाले होते. चर्चेअंती धामापुरकर यांनी पाणी पुरवठ्याबाबत सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन दिले


    एमआयडीसी विभागातील काही भागात २ महिने तर काही भागात १५ दिवसांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे.एमआयडीसी विभागातील संबधित विभागातून सांगण्यात आले कि नवीन पाण्याची लाईन टाकण्याच्या कामाला अजून दोन महिने लागतील.एमआयडीसीकडून पाण्याचा दाब वाढविला जाईल असे आश्वासन दिले आहे. तरी आम्ही आज शांतपणे मोर्चा काढला. एमआयडीसीने पाणी समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढला नाही आम्हाला आमची भूमिका स्पष्ट करावी लागेल.


 

Post a Comment

Previous Post Next Post