मोटारसायकल चोर गजाआड

 


डोंबिवली / शंकर जाधव : मोटारसायकल चोरट्याला पकडून गजाआड करण्यास डोंबिवली रामनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्याला डोंबिवली पूर्वेकडील तुकाराम रसाळ चाळ, लोढा येथून अटक केली. प्रकाश रूपसिंग पुरोहित ( ३६ ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी प्रकाशकडून एक मोटारसायकल हस्तगत केली.२३ फेब्रुवारी रोजी फिर्यादी देवराज मेघजी बारवाडी यांनी त्यांची मोटारसायकल सारस्वत बँकेच्या मेन गेटच्या समोर, सिल्वर कॉईन बिल्डींग, पी पी चेंबर जवळ पार्क केली होती. मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल करताच पोलिसाची सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे चोरट्याला पडकले.

 सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ -३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे)/ तडवी यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल वाघ,सचिन भालेराव, भणगे, लोखंडे पोअ राठोड, पो.अ गवळी, कोती यांनी कामगीरी केली.

Post a Comment

Previous Post Next Post