डोंबिवली / शंकर जाधव : श्री राम नवमीला भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या वतीने डोंबिवली पश्चिमेला रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी अनेक भाविकांनी मंदिरात प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेतले.सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही या ठिकाणी श्री रामाचे दर्शन घेतले.विश्वहिंदू परिषदेच्याावतने शहरात काढण्यात आलेली मिरवणूक सदर ठिकाणी येताच मंत्री चव्हाण आणि माजी नगरसेवक धात्रक यांनी पुष्पहार घालून श्री रामाचे दर्शन घेतले.