डोंबिवली / शंकर जाधव : शिवसेना डोंबिवली उपशहर संघटक तथा माजी नगरसेवक रणजीत जोशी व प्रभाग क्रमांक ६२ च्या माजी नगरसेविका वृषाली जोशी यांचा चिरंजीव अथर्व याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात शनिवारी संपन्न झाला. या निमित्ताने जोशी दाम्पत्यानी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रभागातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
शास्त्रीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे स्त्री-पुरुष पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. त्यांनी वाढदिवसानिमित्त अथर्वला आशीर्वाद व भेटवस्तू दिल्या. यावेळी सर्व जेष्ठांचे शाल पुष्पगुच्छ देऊन जोशी दाम्पत्यांनी स्वागत केले. आपल्या सर्वांचे आशिर्वाद खूप मोलाचे आहेत असे सांगून सर्वांचे आभार मानले. सर्वांनी या निमित्ताने स्नेहभोजनाचा लाभ घेतला.