फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकाला हल्ला होण्याची भीती
डोंबिवली / शंकर जाधव : मनसेच्या इशाऱ्यानंतर डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त असताना पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे कर्मचारी म्हणत आहेत.काही गुंड प्रवृत्तीचे फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका चालकाला केलेली मारहाण आणि उर्सेकर वाडीत दुकानादाराला केलेली शिवीगाळ केल्याची घटना घडली होती.आता कारवाई करताना पोलीस बंदोबस्त मिळत नसताना आपल्या जीव धोक्यात टाकून काम करावे लागत आहे. गुंडप्रवृत्तीच्या फेरीवाल्यांकडून पथकावर हल्ला होण्याची भीती असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
स्टेशन परिसरात १५० मीटरच्या आत फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसविताना दादागिरी सुरु केली. उर्सेकर वाडी, मधुबन –पूजा सिनेमागृह गल्ली, रामनगर तिकीट घरासमोरील रस्ता येथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने सामान्य नागरिकांना येथून चालणेही मुश्कील झाले आहे.`ग` व `फ` प्रभाग क्षेत्रातील पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकाला कारवाई करताना पोलीस बंदोबस्त मिळत नाही.कारवाई करताना गुंडप्रवृत्तीच्या फेरीवाल्यांकडून हल्ले होण्याची भीती असताना पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. फेरीवाल्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असून कारवाई करताना पोलीस बंदोबस्त मिळावा असे पथकातील कर्मचारी म्हणत आहेत.
`फेरीवाल्यांचा दादा` फेरीवाल्यांना बसल्यास जागा निश्चित करत असून त्यानुसार फेरीवाल्यांना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करताना शहरातील आणि शहराबाहेरील फेरीवाले आपली जागा ठरवून आपला हक्क असल्याचे बोलतात. राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलात आणताना नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसण्यास जागा निश्चित केली जात नसल्याने फेरीवाल्यांनी स्टेशन परिसराचा ताबा घेतला होता. नागरिकांच्या अनेक तक्रारी नंतर मनसेने १५ दिवसाची डेडलाईन दिली होती. १५ दिवसांनंतर मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसराची पाहणी केली.त्यानंतर पालिकेकडून कारवाईचा जोर वाढला.मात्र दुकानदारांनी अनधिकृत शेड लावल्याने फुटपाथ अतिक्रमण केल्याचे दिसते. सोमवारी `ग` प्रभाग क्षेत्राचे सहायक आयुक्त संजय साबळे,पथकप्रमुख राजेंद्र साळुंखे यासह पथकाचे कर्मचारी वर्गाने उर्सेकर वाडी, मधुबन – पूजा सिनेमागृह गल्ली व स्टेशन परिसरातील फुटपाथ अतिक्रमण करणाऱ्या दुकाबाहेरील समान जप्त केले.