दिवा / आरती मुळीक परब: दिव्यातील गणेश नगर येथील मानसी रसाळ या चिमुकलीचा नुकताच काविळीमुळे मृत्यू झाला होता. दूषित पाण्यामुळे मानसीला जीव गमवावा लागला असा आरोप तिच्या कुटुंबीयानी केला होता.भाजपच्या दिवा महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांनी रसाळ कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे कावीळ होऊन आमची चिमुकली मृत्युमुखी पडल्याचा आरोप मानसी रसाळ हिच्या कुटुंबीयाने केला आहे.
मानसी रसाळ हिच्या आजीने आपली नात गेल्याचे दुःख व्यक्त करताना दिव्यातील लहान मुलांना आजार होऊ नयेत म्हणून स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.या कुटुंबीयांनी आपल्या भावना ज्योती पाटील यांच्याकडे व्यक्त केल्या. रसाळ कुटुंबीयांवर ओढवलेले संकट पाहून अतिशय दुःख झाल्याचे मत ज्योती पाटील यांनी यावेळी व्यक्त केले अवघ्या सहा वर्षाच्या मानसीला कावीळ सारख्या आजाराने जीव गमावावा लागला.
दिव्यात शासकीय रुग्णालय नसल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आजाराबाबत वेळीच निदान होत नाही व वेळेत उपचार मिळत नाहीत परिणामी येथे सुसज्ज असे रुग्णालय होणे गरजेचे आहे अशी भावना ज्योती पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. असाल कुटुंबीयांच्या पाठीशी महिला म्हणून आपण ठामपणे उभे असल्याचे ज्योती पाटील यांनी यावेळी सांगितले.