घारीवली गावातील ग्रामस्थांचे रस्त्यावर उतरून आंदोलन


डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीजवळी घारीवली गावातील नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले .सर्व ग्रामस्थ कल्याण शीळ रोड च्या एका बाजूला उभे राहिले. कल्याण शीळ रोडवर डिव्हायडर बांधण्यात आला आहे.. यापूर्वी घारीवली गावात जायला कट रस्ता होता.मात्र आता डिव्हायडर बांधल्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.कारण गावात टर्न घेण्यासाठी थेट कोळेगावाच्या दिशेने जायला लागते. त्यामुळे गावकऱ्यांनी त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी देखील संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार केल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले.येथे डिव्हाडर असल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला व इतर ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते.एमएसआरडीसिने गावात जायला डिव्हायडर छेदून पूर्वीसारखा रस्ता द्यावा अशी मागणी घारीवली ग्रामस्थांची आहे असे माजी सरपंच योगेश पाटील म्हणाले. कल्याण शीळ रोडवर ग्रामस्थानी एकत्र येत निषेध केला.सात दिवसात यावर तोडगा काढू असे आश्वासन वाहतूक पोलीस आणि मानपाडा पोलिसांनी गावकऱ्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post