डोंबिवली / शंकर जाधव : शहराच्या काही भागात गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने काही वेळ हजेरी लावली. एकीकडे उन्हाचे चटके, घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले असताना अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्याने नागरिक सुखावले. मात्र ताबडतोब उन्हाच्या ताडक्याने प्रत्येकाची दमछाक झाली. मात्र या अवकाळी पावसाने रस्ते ओले झाले.
सकाळी काही प्रमाणात जरी वातावरण तापलेले असतांनाच दुपारी तीन वाजता अवकाळी पावसाचे टपोरे थेंब आभाळातुन पडू लागतात घरातील काही मंडळींनी रस्त्यावर येणे पसंत करून पावसाचा क्षणीक आनंद घेतला. दरम्यानही काळ्या रंगाचे ढग आकाशात जमू लागले आणि थोडीपार काळोखी आली. मात्र काही मिनिटातच पुन्हा कडक उन्हाचे चटके आणि रखरक वातावरणात होती. पुन्हा उकाड्याने जोर घेतला आणि पूर्ववत रस्त्यावर फिरणाऱ्या मंडळींना उन्हाच्या त्रासापासून सावरण्यासाठी गॉगल आणि टोपीचा आसरा घ्यावा लागला.
महिला वर्ग डोक्याला स्कार्प बांधून उन्हापासून संरक्षण करतानाचे दृष्य तात्काळ दिसून आले. परिणामी थोड्याशा पावसाच्या आगमनाने क्षणिक आनंद मिळाला असला तरी ताबडतोब उकाड्याने डोंबिवलीकर हैराण झाले. सकाळ पासूनच शहरात वातावरण होणाऱ्या बदलामुळे अवकाळी पावसाची हजेरी लागणार याची कल्पना होती. त्याप्रमाणे अखेर दुपारी काही मिनिटे पावसाचा ओलसरपणा डोंबिवलीकरांना अनुभवता आला.