धरणगांव : येथील पी.आर.हायस्कूल येथील ज्येष्ठ शिक्षक बापू देवराम शिरसाठ यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी जाहीर केली. डॉ. बापू शिरसाठ यांनी डॉ. के.के.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार "योगिराज वाघमारे यांचा कथा व कादंबऱ्यांचा समा शास्त्रीय अभ्यास" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता.
डॉ. शिरसाठ यांना पीएचडीचे अधिकृत नोटिफिकेशन देवून विद्यापीठाने गौरवीत केले. पीएचडीचे अधिकृत नोटिफिकेशन देतांना कबचौउमवि चे कुलगुरू महोदय डॉ. व्ही.एल.माहेश्वरी , प्र.कुलगुरू डॉ. एस.टी.इंगळे, अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे , मार्गदर्शक डॉ. के.के.अहिरे, राज्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल सर आणि संकेत शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र