मनसेकडून भाजप नगरसेवक व पालिकेच्या पथकाचे कौतुक
डोंबिवली / शंकर जाधव : स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त होण्यासाठी मनसेकडून १५ दिवसांची डेडलाईन देण्यात आली होती. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनि अतिक्रमण केले होते.मात्र डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन परिसर अनेक वर्षापासून फेरीवाला मुक्त असल्याने मनसेकडून भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक व पालिकेचे फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकाचे यांचे कौतुक केले आहे.
काही वर्षापूर्वी डोंबिवली स्टेशन परिसरात दुकानांवर पालिकेने कारवाई करून जमीनदोस्त केले होते.यावेळी भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक हेही उपस्थित होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने १५० मीटरच्या आत फेरीवाल्यांना बसल्यास मनाई केली होती. फेरीवाल्यांनी १५० मीटर लांब आपले बस्तान बसवले.त्यामुळे अनेक वर्षापासून डोंबिवली पश्चिम फेरीवाला मुक्त झाला.माजी नगसेवक धात्रक यांनी सतत केलेला पाठपुरावा आणि पालिकेची कारवाई यामुळे डोंबिवली पश्चिमेकडील नागरिक धात्रक आणि पालिकेचे फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख विजय भोईर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत आहे.
डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला नव्हता. नागरिकांच्या तक्रारी आल्यावर मनसेने १५ दिवसांपूर्वी १५ दिवसांची डेडलाईन दिल्याने डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनपरिसरातील फ़ेरिवाल्यांवर पालिकेकडून जोरदार कारवाई सुरु झाली. मनसेकडून दररोज याकडे लक्ष ठेवले जात आहे.डोंबिवली पश्चिम फेरीवाला मुक्त होऊ शकतो तर डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त का होत नाही असा प्रश्न डोंबिवलीकरांकडून विचारला जात आहे.तसेच डोंबिवली स्टेशन परिसरातील अनेक वर्षापासूनचे रिक्षाचालकहि शिस्तीचे पालन करत रिक्षा थांब्यावरून प्रवाशांची वाहतूक करत असतात.