डोंबिवली / शंकर जाधव : स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने स्व.आनंद दिघे यांच्या प्रेरणेने शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेनुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरूण जगताप यांनी मंजूर केल्याप्रमाणे कल्याण- डोंबिवली च्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या उपशहर प्रमुख डोंबिवली पश्चिमपदी कैलास सणस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कक्षाचे पदाधिकारी आणि कक्ष प्रमुख यांच्या नियुक्ती पत्राचे वाटप शिवसेना मध्यवर्ती शाखा डोंबिवली पूर्व येथे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेशजी कदम, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख लता पाटील, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्याहस्ते आणि अनेक पदाधिकारी, शिवसैनिक महिला आघाडी सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले.