प्रेयसीने मित्राच्या मदतीने केली प्रियकराची हत्या

  

डोंबिवली /  शंकर जाधव : दोघांची मैत्री जुळली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर एकत्र राहण्यास सुरुवात केली.पण तिचे याच परिसरातील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले.आता तिला प्रियकर नकोसा होता पण तो नेहमी वाद  घालत असल्याने तिने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढला.तिच्या मित्राने प्रियकराची हत्या करून आपणच मारले हे लपविण्याचा प्रयत्न केला.परंतु मानपाडा पोलिसांनी तपास करून दोघांना अटक करून जेरबंद केले.ही घटना २२ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील कोळगाव परिसरात घडली.

   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संध्या सिंग आणि वेदांत उर्फ गुड्डू  शेट्टी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.तर मारुती हांडे असे मयत इसमांचे नाव आहे.गेल्या वर्षभरापासून मारुती आणि संध्या हे डोंबिवलीतील कोळगाव परिसरात राहत होते.संध्याचे याच परिसरात वेदांतशी ओळख झाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.दोघांच्या प्रेमाची कुणकुण मारुतीला लागल्यावर त्याने संध्याला समजावण्याचा प्रयत्न केला.तरीही संध्याने वेदांतशी प्रेम संबंध सुरूच ठेवले.अखेर संध्या आणि वेदांत यांनी प्रेमातील अडथळा  दूर करण्यासाठी मारुतीला संपविण्याचे ठरविले.२२ तारखेला मारुती हा दुपारी घरी जात असताना वेदांतने स्टँपने मारुतीच्या डोक्यावर, हाताला, पायावर मारले.मारहाणीत मारुतीचा जागीच मृत्यू झाला.

  मारुतीची हत्या झाल्याचे मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती मिळताच तपास सुरू केला.हत्येप्रकरणी संध्या व वेदांत यांनी पोलिसांनी अटक केली.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस निरुक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) बाळासाहेब पवार,सापोनी सुरेश डांबरे, अविनाश वनवे, सुनील तारमळे, सपोउपनि भानुदास काटकर, पोहेकाँ सोमनाथ टिकेकर, सुनील पवार, संजय मासाळ, शिरीष पाटील, पोना प्रवीण किनारे, अनिल घुगे, गणेश भोईर, पोकॉं अशोक आहेर, विजय आव्हाड यांनी केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post