डोंबिवली / शंकर जाधव : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकरांना 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' मासिकाच्या वतीने पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते.सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचणाऱ्या ईगल ब्रिगेड फाऊंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांना यावर्षीचा आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी नियतकालिकांच्या विश्वात आमदार रविंद्र चव्हाण संपादित डोंबिवलीकर' मासिकाने १४ वर्षांत वेगळा ठसा उमटविला आहे. 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार मासिकाचे यंदाचे १५ वे वर्ष आहे.दरवर्षी साहित्य, संगीत, शिक्षण, चित्रकला, नृत्य, क्रीडा, पत्रकारिता, जाहिरात, फोटोग्राफी, सामाजिक कार्य, आरोग्य, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान व अन्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि तरूण व्यक्ती तसेच संस्थांचा आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.यावर्षी 'आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा रविवार ३० एप्रिल रोजी सायं. ५ वाजता आप्पा दातार चौक, श्रीगणेश मंदिर जवळ, डोंबिवली (पू.) येथे संपन्न होणार आहे.