शैलेश पाटील यांच्या पुढाकाराने दिवावासीयांना देवी एकविरा आईचे दर्शन!

 

दिवा/ आरती मुळीक परब : दिव्यातील पाच हजारहून अधिक महिला, पुरुष, लहान मुलं या सर्वांनी आनंदाने आणि भक्ती भावाने एकविरा आईचे दर्शन घेतले, अशी भावना एकविरा आई देव दर्शन सोहळ्याचे आयोजक शैलेश पाटील यांनी व्यक्त केली.

रविवारी दिव्यातील हजारो नागरिकांनी एकाच वेळी आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. माजी नगरसेवक व शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी हा उपक्रम आयोजित केला होता.

दिवा शहरातील सर्व सामान्य नागरिकांना मोफत देवदर्शन सामूहिक पध्दतीने घेता यावे, नागरिकांमध्ये बंधुभाव वाढवा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले.

दिव्यातून सर्व देवी भक्तांना आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी 108 विशेष बससेसची व्यवस्था करण्यात आली होती. हा संपूर्ण देवदर्शन सोहळा नागरिकांना मोफत होता. शैलेश पाटील आयोजित देवी एकविरा आई दर्शन सोहळ्यात दिव्यातील सुमारे पाच हजार हुन अधिक नागरिक सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात दिव्यातून देवदर्शन साठी सामूहिक रित्या नागरिक जाण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

राजकारणा पलीकडे समाजसेवेचे व्रत म्हणून देवदर्शन सोहळ्याचे आयोजन!

माजी नगरसेवक शैलेश पाटील हे विविध उपक्रम राबवून दिवा शहरातील जनतेला दिलासा देण्याचे काम करत असतात. राजकारणा पलीकडे समाजसेवेचे व्रत जपण्याचे काम शैलेश पाटील करत असतात. कोरोना काळात मोफत लसीकरण चा उपक्रम देखील शैलेश पाटील यांनी स्वतःच्या वाढदिवसा निमित्त दिव्यात पहिल्यांदा आयोजित केला होता. सामान्य दिवेकरांच्या जीवनात आनंद मिळावा यासाठी शहरातील हजारो नागरिकांना एकाच वेळी देवी एकविरा आई दर्शन घडविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post