शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदत
डोंबिवली/ शंकर जाधव : कल्याण - डोंबिवलीत अंध शाळा नसल्याने अंध विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जावे लागते. मात्र आर्थिक स्थिती नसल्याने काही अंध विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे मुश्कील होत आहे. अश्या विद्यार्थ्यांना कॉंग्रेसने मदतीचा हात पुढे केल्याचे दिसते.कॉंग्रेस कल्याण - डोंबिवली जिल्हा सरचिटणीस श्यामराव यादव यांनी डोंबिवलीतील एका अंध विद्यार्थ्याला आर्थिक मदत केली.
सुनीता यादव यांचा मुलगा प्रिन्स हा अंध आहे. प्रिन्सला शालेय शिक्षण घेण्यासाठी दररोज मुंबईतील नेरूळला जावे लागते. तिकडेच प्रिन्स संगणकांचे प्रशिक्षण घेतो.प्रिन्सची घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने उदरनिर्वाह करताना अडचण येत आहे.पोटाची खळगी भरताना मुलाला शिकून मोठ कस कराव असा प्रश्न प्रिन्सच्या आईला पडला.प्रिन्सच्या आईने कॉंग्रेस कल्याण - डोंबिवली जिल्हा सरचिटणीस यादवयांची जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.यादव यांनी सुनीता यांची व्यथा ऐकून मदत करण्याचे ठरविले.जनसंपर्क कार्यालयात प्रिन्स व त्याच्या आईला आर्थिक मदत केली. यात प्रीन्सचे शैक्षणिक खर्च व संगणक खर्च तसेच प्रिन्सला शाळेत जाण्यासाठी गाडी खर्च मिळाल्याने सुनीता यांनी कॉंग्रेस पदाधिकारी श्यामराव यादव यांचे आभार मानले.ब्लाईड प्रोगेसिव्ह वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष अनिल दिवटे म्हणाले,एका अंध विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉंग्रेसने मदतीचा हात दिल्याबद्दल संस्थेच्यावतीने आभार मानतो.
१ जूनपासून डोंबिवलीत पहिली अंध शाळा सुरू होणार
विनाअनुदानित तत्वावर शासनाने ब्लाईड प्रोगेसिव्ह वेल्फेअर फौंडेशनला दिलेल्या परवानगी नुसार येत्या १ जून पासून डोंबिवलीत अंध विधार्थ्यासाठी पहिली शाळा सुरु होणार आहे.पहिले ते सातवी पर्यतच्या शाळेत सुरुवातीला १५ अंध विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यात डोंबिवलीतील एक तर ग्रामीण भागातून १४ विद्यार्थी आहेत. डोंबिवली पश्चिमेला स्टेशनजवळील सनसाईन काॅ. ऑप.हौसिंग सोसायटीत आठ वर्ग असूनत्यातील एक वर्ग संगणक प्रशिक्षणासाठी आणि एक वर्ग संगीत शिकण्यासाठी असणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल दिवटे यांनी दिली.