मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. मागील काही काळात सोन्याच्या दरांत मोठी वाढ झाली असली तरी या विशेष मुहूर्ताचे औचित्य साधून सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहील असा विश्वास मेलोराच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सरोजा येरामिल्ली यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी या विशेष दिनाचे औचित्य साधून सोने खरेदीसाठी ग्राहकांची २० ते ५० हजार रुपये किमतीच्या दागिन्यांना विशेष पसंती राहील.
त्या पुढे म्हणाल्या की अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांचा ओढा हा २० ते ५० हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतील अशा अंगठी, कानातले, पेंडंट्स, चैन आदी दागिन्यानाकडे असेल. ग्राहकांचा हा ट्रेंड लक्षात घेऊन आम्ही अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ५ ट्रेण्डी कलेक्शन्स, ३५० हून धिक सोने व हिऱ्यांचे दागिने लॉन्च केले आहेत. यात ३००० रूपयांपासून सुरू होणारे दागिने असून कलेक्शनमधील ७० टक्के आभूषणांची किंमत ५०,००० रूपयांहून कमी आहे. मेलोरा हा आधुनिक ट्रेण्ड्स व स्टाइल्सचा समावेश करत बीआय-हॉलमार्क सोने व प्रमाणित हिऱ्याचे दागिने ऑफर करणारा सर्वात किफायतशीर ज्वेलरी ब्रॅण्ड आहे. या कलेक्शनचा देशातील प्रत्येक महिला व पुरूषाला खिशावर अधिक भार न पडता या शुभप्रसंगी सोने खरेदी करण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे.
मेलोरो दैनंदिन वजनाने हलक्या दागिन्यांमध्ये विशेषीकृत आहे आणि महिलांसाठी १६,००० हून अधिक डिझाइन्स, तर पुरूषांसाठी १०० हून अधिक डिझाइन्स ऑफर करते. ब्रॅण्ड आपल्या डिझाइन्सना अद्ययावत ठेवण्यासाठी दर शुक्रवारी ७५ नवीन स्टाइल्स सादर करते.