डोंबिवलीत अवजड वाहनांना बंदी असतानाही वाहतूक

  त्या अपघाताला जबाबदार कोण ? 

   डोंबिवली / शंकर जाधव :  सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी 4 ते रात्री ९ या वेळेत डोंबिवली शहरात अवजड वाहनांना बंदी आहे.मात्र डोंबिवलीत या नियमांना पायदळी तुडवत अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असते.वाहतूक पोलिसांकडून अश्या वाहनांवर कारवाई होत नसल्याची ओरड सुरू आहे.अवजड वाहनचालकांना नियम मोडत असल्याची भीती वाटत नसल्याने डोंबिवली सरार्सपणे वाहतूक सुरू असल्याने अपघाताची शक्यता नाकारत येत नाही.शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मानपाडा रोडजवळ एका डंपरने पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

      शुक्रवार सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील  डाॅ. राजेंद्र प्रसाद रोडवर घडली.देवानंद कातीलाल रावल (५३ ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.रस्त्यावरून पायी चालत असताना डंपरचे चाक रावल यांच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात डंपरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.अपघात घडल्यावर रस्त्यावरुन जाणा-या अन्य पादचाऱ्यांनी आरडाओरडा केला असता डंपरचालक पसार झाला आहे.

 रामनगर पोलिसांनी डंपर जप्त केला असून पुढील तपास सहायक पोलीस  निरीक्षक विजय कांबळे करत आहे.दरम्यान, सळ्यांनी भरलेला हा डंपर डोंबिवलीत कुठे जात होता, या डंपरचा मालक कोण आहे ? नियम मोडून शहरात अवजड वाहने चालविणाऱ्यांना होत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी डोंबिवली शहरात कारवाई केल्यास अवजड वाहनांची वाहतूक बंद होईल अशी मागणी होत आहे. डोंबिवली वाहतूक उपशाखेकडून जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यत किती अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली याची माहिती सहायक पोलीस आयुक्तांनी घेणे आवश्यक आहे.




Post a Comment

Previous Post Next Post