दुसऱ्या नोटाबंदीवर टीका करणार का ?
डोंबिवली / शंकर जाधव : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी मानव अधिकार एव सूचना अधिकार विभाग याच्या वतीने माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी गौरव पुरस्कार सोहळा येत्या गुरुवार २५ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हाथ से हाथ जोडो अभियानहि पार पडणार आहे. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार राहणार असल्याची माहिती प्रदेश प्रतिनिधी व उपाध्यक्ष पाॅली जेकब यांनी सांगितले.
या पुरस्कार सोहळ्यात कॉंग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नुकतेच दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश सरकारने दिल्याने यावर अनेक स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारमध्ये अनेक वर्ष सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेस पक्षातून टीकेची झोड उठली आहे. ८ ऑक्टोबर २०१६ रोजी केद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केली होती. आता पुन्हा दुसऱ्यादा नोटाबंदी केल्याच्या निर्णयावर कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.