एमसीए कॉर्पोरेट ट्रॉफी ’एफ’ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
मुंबई,: रंगतदार लढतीत अरुप्रित टायगर्सवर 33 धावांनी मात करताना जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड एससीने एमसीए कॉर्पोरेट ट्रॉफी ’सी’ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कांदिवली येथील एमसीए सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मंगळवारी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर जेएसडब्ल्यू स्टील संघाला 18.2 षटकांत 111 धावांमध्ये गुंडाळण्यात अरुप्रित टायगर्सला यश आले. पराग जाधवच्या 38 धावांमुळे जेएसडब्ल्यूला शंभरी पार करता आली. मात्र, अरूप्रित टायगर्सना माफक लक्ष्य पार करता आले नाही. फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांची मजल 18.4 षटकांत 78 धावांपर्यंतच गेली. तुषार चाटेने 26 धावा करताना चुरस निर्माण केली तरी यश कृपाल, निखिल अंभिरे आणि चिराग किणीने अचूक मारा करताना जेएसडब्लू स्टीलला अप्रतिम विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक: जेएसडब्लू स्टील लि. सीसी-18.2 षटकांत सर्वबाद 111(पराग जाधव (36 चेंडूंमध्ये 38 धावा, 6 चौकार), अर्जुन थापा 20; पियुष कनोजिया 3-15, हृषिकेश पवार 3-26, निरंकर शर्मा 2-18, नविन वाघ 2-23) वि. अरुप्रित टायगर्स-8.4 षटकांत सर्वबाद 78(तुषार चाटे 26; यश कृपाल 2-11, निखिल अंभिरे 2-14, चिराग किणी 2-15). निकाल: जेएसडब्लू स्टील सीसी 33 धावांनी विजयी.