प्रत्येक स्थानकात कारवाई होणे आवश्यक असल्याची प्रवासी संघटनेची मागणी
कल्याण / शंकर जाधव : कल्याण रेल्वे पुलावर एका तरुणीला गर्दुल्ल्याने मिठी मारल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडल्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाल्याचे दिसते. मनसेने आक्रमण भूमिका घेत पुलावरील गर्दुल्ल्यांना हाकलून दिले. कल्याण रेल्वे स्थानक व पूल गर्दुल्ले मुक्त करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा दिला.बुधवारी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांनी संयुक्त कारवाईत ३१ गर्दुल्यांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येक स्थानकात कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.
कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे गर्दुल्ले व बेगर्स यांच्या विरोधात विशेष मोहिमेअंतर्गत रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत एकूण १७ तसेच रात्री १४ असे एकूण ३१ बेगर्स व गर्दुल्ले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही सलग चालू राहणार असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस वपोनि ढगे यांनी सांगितले.कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्याने दररोज हजारो प्रवासी येत-जात असतात.प्रत्येक फलाटावर सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने पोलीसांचा वाँच असतो.एखादी संशयित व्यक्ती अथवा मोबाईल चोरटे या नजरेतून सुटत नाहीत.स्थानकात पोलिसांची गस्ती असली तरी ती काही प्रमाणात कमी पडत असल्याची वास्तविकता नाकारता येत नाही.कल्याण स्थानकात हजारो प्रवासी येत असल्याने स्टेशनबाहेर वाहनांची वर्दळ असते.तर पुलाचा ताबा भिकारी आणि गर्दुल्ल्यांनी घेतल्याचे भयाण वास्तविक डोळ्यासमोर असूनही आजवर यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही.कल्याण मधील एका धक्कादायक घटनेने पोलिसांची झोप उडवली आणि महिला प्रवासी असुरक्षित असल्याचे सत्य समोर आले.प्रवाशांची सुरक्षा ही पोलिसांची जबाबदारी असून यावर पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
कल्याण मधील घटबेचा प्रवासी संघटनेन निषेध केला असून कल्याण रेल्वे स्थानक गर्दुल्ले मुक्त झालेच पाहिजे अशी मागणी केली आहे.उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस तथा तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून ते कर्जत ,कसारा या स्थानकात व पुलावर एकही गर्दुल्ले व फेरीवाले दिसता कामा नये.ही जबाबदारी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाची आहे.कल्याण मधील घटनेनंतर कारवाई सुरू झाली.