शिंदेच्या बालेकिल्लात ठाकरेंची तोफ
डोंबिवली / शंकर जाधव: २ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा आणि डोंबिवली पश्चिमेकडील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार आहेत.ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला समजला जातो. शिंदे यांच्या बालेकिल्लात ठाकरे यांची तोफ डागणार असल्याने ठाकरे शिंदे – फडणवीस सरकार काय बोलतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शाखेच्या कामाबाबत माहिती घेण्यासाठी ठाकरे गटाचे रत्नागिरीचे आमदार राजन साळवी यांनी डोंबिवलीत पाहणी केली.उद्धव ठाकरे डोंबिवलीत येणार असल्याने इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्याचा प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
डोंबिवली पूर्वेला शिवसेना शहर शाखा असून पश्चिमेला शहर शाखेचे काम सुरु आहे.येत्या २ जून रोजी डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील शहर शाखेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.या दिवशी डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदान येथे शिवराज्याभिषेक सोहळा आणि पोवाडा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे सोहळ्यात उपस्थिती दर्शविणार आहेत.
ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे.या बालेकिल्लात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गददर्शन करणार आहेत.पक्षप्रमुख येत असल्याने कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.ठाकरे शैलीतील भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिकचा नव्हे तर कल्याण-डोंबिवलीकर आतुर आहेत.ठाकरे गटाची डोंबिवलीतील ही शाखा सुरु होणार आहे.तसेच आदित्य ठाकरेही यादिवशी येण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अनेक वेळेला डोंबिवलीतील जाहीर सभा गाजवली होती.मात्र आता परिस्थिती तशी नसून ठाकरे यांचे सेना ठाणे जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी आपले स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. शिंदेच्या बालेकिल्यात ठाकरे यांचा उपस्थिती आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे गटाला विचार करणारी ठरेल असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरु आहे.पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा पालिकेवर आणण्यासाठी ठाकरे गटातून कोणती रणनीती आखली जाईल, कोणता गमिनी कावाचे राजकारण होईल ? ठाकरे यांना कल्याण-डोंबिवलीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी किती मदत करेल हे येत्या निवडणुकीत दिसेल.