भिवंडी, दि. २३ : भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ हे 22 मे ते 26 मे या दरम्यान रजेवर गेले असल्या कारणाने भिवंडी महानगरपालिकेचा अतिरिक्त आयुक्त पदभार उल्हासनगरचे आयुक्त अजिज शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
अजिज शेख यांनी दुपारी भिवंडी महानगरपालिका कार्यालयास भेट देत येथील अधिकारी, विभागप्रमुख यांच्यासोबत चर्चा करून कामाचा आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त दीपक झिजाड, प्रभाग अधिकारी सुदाम जाधव, फैसल तातली, बाळाराम जाधव,पाणीपुरवठा अभियंता संदीप पटनावर, विधी अधिकारी अनिल प्रधान, शहर अभियंता सुनील घुगे, अतिक्रमण विभागप्रमुख शाकीब खरबे यांच्यासह विविध प्रभाग अधिकारी उपस्थित होते. पावसाळा तोंडावर असताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अनधिकृत व धोकादायक इमारतींवर कारवाई करावी तसेच गटार, नाले व शहर स्वच्छतेकडे पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य ते लक्ष द्यावे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी प्रभारी आयुक्त अजिज शेख यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला आहे.