खार जिमखान्याचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत


मुंबई,23 मे : फॉर्मात असलेल्या खार जिमखान्याच्या  आणि बी अशा दोन्ही संघांनी बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (बीएसएएमआयोजित ग्रेटव्हाइट सीसीआय केकू निकोल्सन मुंबई बिलियर्ड्स लीगच्या (2023)उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

राउंड ऑफ सिक्स्टिन फेरीत अनुभवी क्यूईस्ट दीपक खुबचंदानी यांच्या नेतृत्वाखालील खार जिमखाना ’’ संघाने इशप्रीत सिंग आणि सुमेर मागो यांच्यासह चेंबूर जिमखाना ’’ संघावर 432-302 गुणांनी विजय मिळवताना आगेकूच केली.
खार जिमखाना ‘बी’ संघाला रेडिओ क्लबविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव पाहावा लागलाया स्पर्धेतील एकमेव महिला खेळाडू वर्षा संजीव हिला (-35 हँडिकॅपराष्ट्रीय ज्युनियर बिलियर्ड्स विजेता रायन राझमीकडून (-70 हँडिकॅप) 200-105 अशी मात खावी लागलीमात्रस्पर्श फेरवानीने औपचारिकता पूर्ण करण्याआधी क्रिश गुरबक्षनी याने चुरशीची लढत देत खार जिमखान्याला रेडिओ क्लबविरुद्ध 397-315 असा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
निकाल - (राउंड ऑफ 16) : मातोश्री क्लब विजयी विचेंबूर जिमखाना ‘’ संघ 708-579; खार जिमखाना ‘बी’ विजयी विरेडिओ क्लब 397-377; खार जिमखाना ‘’ विजयी विचेंबूर जिमखाना ‘’ 432-302; पार्क क्लब विजयी विगरवारे क्लब हाऊस 700-640. 

Post a Comment

Previous Post Next Post