कांदिवली येथील एमसीए सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीत मंगळवारी जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 165 धावा केल्या. त्यात डावखुर्या कौशल तांबेचे सर्वाधिक 44 धावांचे योगदान राहिले. प्रत्युत्तरादाखल, ऑटोमोटिव्ह सीसीची मजल 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत गेली. जैन इरिगेशनचा फिरकीपटू शुभम शर्मासह शशांक अत्तर्डे आणि जगदीश झोपे यांनी अचूक मारा करताना विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक: जैन इरिगेशन सीसी -20 षटकांत 8 बाद 165 (कौशल तांबे(27 चेंडूंत 44 धावा, 2 चौकार, 2 षटकार), सुवेद पारकर 37 (24 चेंडूंत 37 धावा, 5 चौकार), जय जैन 24; संतोष चव्हाण 3-24, आदित्य राणे 3-29) विजयी वि. ऑटोमोटिव्ह सीसी - 20 षटकांत 9 बाद 144-आदित्य शेमाडकर (24 चेंडूंत 37 धावा 6 चौकार, मनेश भोगले (21 चेंडूंत 32*, 1 चौकार, 2 षटकार), सुशांत वाजे(19 चेंडूंत 27 धावा, 2 चौकार, 2 षटकार); शुभम शर्मा 3-16, जगदीश झोपे 2-22, शशांक अत्तर्डे 2-24). निकाल : जैन इरिगेशन 21 धावांनी विजयी.
Tags
क्रीडा