गिरणी कामगारांना लवकरच घरे मिळणार

 


मुख्यमंत्र्याच्या हस्ते घरांच्या चाव्या - सुनील राणे 

मुंबई/ प्रतिनिधी :  गिरणी कामगारांच्या स्वप्नातील घर बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. २०२० सालच्या सोडतीतील बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिल मधील पात्र १०० गिरणी कामगारांना त्याचा ताबा देण्याची तयारी म्हाडाकडून सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळताच पुढील आठवड्यात १०० गिरणी कामगारांना चाव्या देण्यात येतील, असे गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी सांगितले.  

        गिरणी कामगारांच्या २०२० च्या सोडतीतील बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिल मधील कामगारांना घरे देण्यास कोरोना मुळे विलंब झाला होता. गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने गिरणी कामगार सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. २०२० च्या सोडतीमधील ३ हजार ८९४ सदनिकेची लॉटरी झाली होती. त्यापैकी अनेक गिरणी कामगारांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने ते पात्र झाले होते. परंतु एकालाही घर देण्यात आले नव्हते, ७७७ लोकांनी पैसे भरले परंतु त्यांना मुद्रांक शुल्क आणि मेन्टेन्स भरण्याची पत्र म्हाडाकडून पाठवण्यात आली नव्हती.

     म्हाडाकडून ६०० देकार पत्र तैयार करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यापैकी ७० जणांनी कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ मागतील असून पुढील आठवड्यात १०० कामगारांना चाव्या देण्यात येणार असल्याचे आमदार सुनील राणे यांनी सांगितले. राहिलेल्या २०२० च्या सोडतीतील २,४५६ कामगारांना पत्र पाठवली असून त्यांची पात्रतेची कार्यवाही वेगात सुरू असून त्यांची देकारपत्र सुद्धा तयार आहेत त्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांना घरांच्या चाव्या देण्यात येतील.

मेन्टन्सचे पैसे सुद्धा मिळणार

      गिरणी कामगाराला दिलेल्या मुदतीमध्ये पैसे भरायचे असतात, मुदतीत पैसे न भरल्यास त्यांना व्याज आकारले जाऊ नये त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच गिरणी कामगाराला ज्या वेळी चावी देण्यात येणार त्यावेळे पासून मेन्टेन्स घ्यावा असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ५० हजार मेन्टन्स ची रक्कम मुंबई बँक घराच्या रक्कमे सोबत मेन्टन्सचे पैसे सुद्धा देणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post