चिमुकल्याचा शोध घेण्यासाठी 12 मिनिटात घटनास्थळी


 शिवसेनेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज

डोंबिवली ( शंकर जाधव ) आपत्कालीन परिस्थितीत सरकारला मदत म्हणून शिवसेनेने आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा विभाग सुरू करण्यात आला.कल्याण - ठाकुर्ली स्टेशन दरम्यान सहा महिन्यांची चिमुरडी आजोबांच्या हातून निसटून नाल्यात पडल्याची माहिती मिळताच ह्या विभागाचे पथक १२ मिनिटात घटनास्थळी पोहोचून शोध कार्य सुरु केले होते. या पथकात एकूण ५० असून यातील २५ जण प्रशिक्षित असल्याची माहिती डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली.

    उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, दीपक भोसले, सागर जेधे, संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, दिनेश शिवलकर, प्रकाश माने, वैभव राणे, अमोल पाटील, पांडुरंग चव्हाण, ज्ञानेश पवार, शैलेश भोजने, बालन मोरे यांसह शिवसेना डोंबिवली शहर शाखेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, सर्वसामान्यांसाठी शिवसैनिक सदैव तत्पर असतात. कोणत्याही घटनेची माहिती पालिकेच्या आपत्कालीन कक्ष व अग्निशामक दलाला माहिती मिळते.प्रशासनाला यात मदत मिळावी म्हणून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना केली.आतापर्यत दहा कॉल आले असून हे पथक वेळेवर पोहोचले होते.

उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडे मदतकार्यासाठी सर्व प्राथमिक साहित्य ,वोकीटॉकी आहेत.तर संतोष चव्हाण म्हणाले, मदतीसाठी वैभव राणे 8828558040, अरविंद वस्त्रे 8689861111 व उत्तम भोर 8828491660 क्रमांकावर संपर्क साधावा.शिवसेनेने हे पथक स्थापन करून एकप्रकारे मदतीचा हात पुढे केले आहे.आपत्कालीन वेळेत हे पथक मदत करत असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post