नवी दिल्ली: बॅडमिंटन कोरिया ओपनमधील पुरुष दुहेरी जेतेपदाच्या अंतिम सामन्यात भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांनी इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो यांचा पराभव करून कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात चिराग - सात्विकसाईराजने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो या जगातील नंबर वन जोडीचा १७-२१, २१-१३, २१-१४ असा पराभव केला. अंतिम फेरीच्या पहिल्या सेटमध्ये चिराग - सात्विकसाईराजला
१७-२१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर चिराग - सात्विकसाईराजने शानदार खेळाचे प्रदर्शन करत पुनरागमन केले आणि शेवटचे दोन सेट २१-१३ आणि २१-१४ असे जिंकून जेतेपद पटकावले.
Tags
क्रीडा