पुरुषांच्या वंध्यत्वावर मात करता येणार

 


डोंबिवलीत प्रथमच उच्च तंत्रज्ञानयुक्त उपचार सुरू 

डोंबिवली / शंकर जाधव : एखाद्या स्त्री व पुरुषाला बाळ हवे असल्यास गरोदरपणापासून ते बाळंतपणापर्यंतचा आधुनिक तंत्रज्ञाने युक्त असा सुखकर प्रवास एकाच छताखाली व्हावा यासाठी इशा वुमेन्स हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पुरुषांच्या वंध्यत्वावर उच्च तंत्रज्ञानयुक्त मेल अँड्रोलॉजी विंग उपचार पद्धतीने मात करता येणार आहे. शुक्राणूंची संख्या शून्य असली तरी मेल फर्टीलीटी उपचार पद्धतीद्वारे यद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांच्याच शुक्राणूमुळे बाळ होऊ शकते. त्यामुळे निराश होण्याचे कारण नसल्याचे आय वी एफ तंत्रज्ञान तज्ञ डॉ.चिन्मय पत्की यांनी पत्रकारांना  दिली.

    मध्यमवर्गीयांना जोडप्यांना आर्थिक दृष्ट्या परवडेल अशी उच्च तंत्रज्ञान युक्त उपचार पद्धती डोंबिवलीत सुरु होत आहे. याचा लाभ मध्यमवर्गीय - गरीब कुटुंबातील जोडप्यांनी घ्यावा असे आवाहन डॉ.पत्की यांनी यावेळी केले.  याबाबत अधिक माहिती देताना डॉ.चिन्मय पत्की म्हणाले, डोंबिवली येथे स्त्री वंध्यत्वावरील उपचार पध्दतीसोबत पहिल्यांदा पुरुष वंध्यत्वावरील उपचार पद्धती सुरु करण्यात येत आहे. ईशा वुमेन्स हॉस्पिटलच्या वतीने स्त्रियांसाठी सुपर स्पेशालिटी सुविधा असलेल्या हॉस्पिटलची सुरुवात करीत आहेत. 

या हाॅस्पिटलमध्ये आय व्ही एफ लॅप्रोस्कोपी आणि मॅटर्निटीच्या सुविधा प्राप्त करून देणार आहोत. बाळंतपणासाठी सुद्धा उच्च दर्जाची सेवा देण्यात येईल.आय वी एफ उच्चतंत्रज्ञानाने अवगत असे केंद्र हॉस्पिटलच्या वतीने सुरू करण्यात आले. संगणकाद्वारे गर्भाच्या वाढीचे अनुमान,आय वी एफ प्रयोगशाळेची बांधणी, शुद्ध हवेचा दर्जा, गर्भाच्या वाढीसाठी लागणाऱ्या पर्यावरणाची निर्मिती उच्च तंत्रज्ञानाने युक्त आहे. पुरुषांच्या वंध्यत्वावर असलेली शून्य शुक्राणू तपासणीवरील मायक्रो टिसा पद्धती, आय वी एफ मध्ये जनुकीय निदान , टाईमलॅप्स  तंत्रज्ञान द्वारे तपासण्या ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हॉस्पिटलच्या वतीने सुरू करण्यात आल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबांना सीएसआरच्या माध्यमातून फार्मा कंपन्या द्वारे निधी उपलब्ध होऊ शकतो किंवा अनेक विमा कंपन्या उपचारासाठी अटी नियमानुसार आर्थिक सहाय्य करु शकतात.जगातल्या  उच्च तंत्रज्ञानाचा फायदा कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील नागरिकांनी इशा हाॅस्पिटलच्या वतीने घ्यावा असे आवाहन डॉ. चिन्मय पत्की यांनी केले.



Post a Comment

Previous Post Next Post