ठाणे/ मुंबई : भारतीय हवामान खाते यांच्यावतीने गुरुवारी दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ठाणे, मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना गुरुवारी सुटी जाहीर केली आहे. सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
महाराष्ट्र