यवतमाळ तालुक्यात सरासरी ३८ मिमी पावसाची नोंद

 


यवतमाळ:  यवतमाळमध्ये गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी रौद्ररूप धारण केले. सतत सुरू असणार्‍या  पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला. त्याचबरोबर अनेक रस्त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक करताना स्थानिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. संपूर्ण यवतमाळ तालुक्यात सरासरी ३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

यवतमाळच्या महागावमध्ये पुरात अडकलेल्यांची नागरिकांची हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. हवामान सुधारल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

यवतमाळमध्ये शुक्रवारी उमरखेड तालुक्यात ६९.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय, महागाव (४९.३ मिमी), आर्णी (५७.४ मिमी), दिग्रस (११.८ मिमी), पुसद (९.६ मिमी), नेर (३.९ मिमी), वणी (२० मिमी), मारेगाव (१४.५ मिमी), झरी (१०.९ मिमी), केळापुर (१५.२ मिमी), घांटजी (१५.५ मिमी), राळेगाव (६८ मिमी), दारव्हा (८८ मिमी), बाभुळगाव (८ मिमी), कंळब (४.२ मिमी) आणि यवतमाळ तालुक्यात सरासरी ३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याचे यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post