डोंबिवली ( शंकर जाधव ) मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराविरोधात देशभर निर्देशने होत आहेत. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( ठाकरे गट ) आणि राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजप सरकार विरोधात निदर्शने केली. देश सांभाळत येत नाही, देशभरात दौरे करता आणि देशात काय घडतंय याकडे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष नाही अशा शब्दात टीका यावेळी टिक करण्यात आली.
या आंदोलनात ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ,डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, महिला आघाडीच्या पदाधिकारी कविता गावंड, मंगला सुळे, किरण मोंडकर , राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे नंदू धुळे, सुरय्या पटेल, संगीता मोरे, प्रणिता कांबळे, भारती निकम आदी उपस्थित होते. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ म्हणाले, मणिपूरमधील घटना लाजिरवाणी आहे.याचा निषेध म्हणून भाजप सरकार विरोधात आंदोलने केले.पंतप्रधान मोदी यांनी या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री बीरेन सिंह सरकार बरखास्त करावे. महिला पदाधिकारी कविता गांवड आणि मंगला सुळे यांनी देशात महिला सुरक्षित नसल्याचे सांगितले.