डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून व डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरप्रमुख अमित (अण्णा) बनसोडे यांच्या सहकार्याने पूर्वेकडील नांदीवली रोड येथील कार्यालयात गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. कोविड या जागतिक महामारीमुळे सगळी कडे जनजीवन विस्कळित झाले असुन यात अनेकांचे प्राण गेले, तसेच काहींना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. यात अनेक विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित देखिल राहिले.अश्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी शिवसेना असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य शिवसेना पुरवत असते असे डोंबिवली विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये, म्हणूनच मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी मा. संतोष चव्हाण ( डोंबिवली विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण,(डोंबिवली उपशहर प्रमूख अमित ( अण्णा बनसोडे ) , उपशहर संघटक संतोष तळाशिल , विभागप्रमुख नंदिवली ॲड. स्वप्निल पाटील यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक तथा उद्योजक विजय आंबावकर , डोंबिवली शहर शिवसेना बंजारा समाज डोंबिवली शहर अध्यक्ष तथा उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर राठोड, उपविभाग प्रमुख तुकाराम वाडकर, संभाजी राठोड, प्रशांत सोमवंशी, योगेश महाजन यांसह अनेक कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी निवेदक अभिजीत भूपाल -पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर राठोड यांनी केले.