गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करून सामाजिक कार्यकर्ते शाम गौड यांचा वाढदिवस साजरा

डोंबिवली ( शंकर जाधव ) : आयरेगांव डोंबिवली पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते शाम गौड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र-परिवाराला एक वेगळा संदेश दिला. वाढदिवसाच्या दिवशी डिस्को,नाच-गाणे, पार्टी यांपासून अलिप्त राहून तुमचा आनंद गरजू लोकांना एक दिवस तरी उपासमारी सहन करावी लागणार नाही यासाठी कार्य करा. त्यांना अन्नधान्य देऊन आनंदी ठेवा, सर्वसामान्य माणूस आनंदी रहावा अशीच प्रार्थना करू या असे सांगून त्यांनी परिसरातील गरजू लोकांना धान्याचे किट वाटप केले. यावेळी गौड यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक मंदार टावरे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने होता.

सकाळी श्याम गौड यांनी वाढदिवसानिमित पूर्वेकडील बालाजी गार्डन येथे वृक्षारोपण केले. वृक्षारोपण माध्यमातून सोसायटीच्या आवारात डोकोमा जातीची झाडे लावली. त्यानंतर त्यांनी आयरेगांव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील सभागृहात उपस्थित गरजू लोकांना धान्याचे किट वाटप केले. तसेच हिराई बंगला गरिबांचा वाडा डोंबिवली पश्चिम येथील साधना आधारवृद्ध सेवा केंद्रातील वृद्धांना आवश्यक वस्तू वाटप केले.



वृद्धाश्रमास मदत केल्याबद्दल संचालिका सुमेधा थत्ते यांनी गौड यांचे आभार मानले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आयरे गाव डोंबिवली पूर्व येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक मंदार टावरे, मनोज प्रजापती, संकेत म्हात्रे, गोपाल रेड्डी, मच्छिंद्र चव्हाण, दिपक ठाकरे, निखिल माने, पवन कदम, अजिंक्य कर्णिक, किरण वाकोडे, प्रयाग कदम, अक्षय कारभारी, अशोक देवरे, राज मगरे आदी उपस्थित होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौड म्हणाले, आपला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करावा असे प्रत्येकालाच वाटते.त्यात काही चुकीचे नाही.त्याच बरोबर वाढदिवसाला सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंना मदत करावी या उद्देशांने मी मदतीचा हात पुढे केला.तर माजी नगरसेवक टावरे यांनी गौड यांच्या समाजकार्याचे कौतुक केले.



Post a Comment

Previous Post Next Post