डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ डोंबिवली बस स्थानक हे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली असून सोयी सुविधा नसल्याने शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक महेश बोये यांची यांची भेट घेऊन जाब विचारला.
कोकणवासीयांना कोकणात जाण्यासाठी तांसनतास बस स्थानकात वाट पहावी लागते. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तक्रार पेटी नाही. शौचालयाची दुरावस्था असल्याने प्रवासी पुरते वैतागले आहे.यावर बोये यांनी लवकरच सर समस्यां सुटतील असे आश्वासन पदाधिकारी व कार्यकर्त्याना दिले.
Tags
महाराष्ट्र