दिवा स्थानकात स्वयंचलित सरकत्या जिन्याचे लोकार्पण

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदान संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नाने व  दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणी नुसार तयार झालेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्याचे बुधवारी  शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक ब्रह्मा पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, उपशहर प्रमुख व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड आदेश भगत, नगरसेवक दिपकजाधव विभाग प्रमुख उमेश भगत, भालचंद्र भगत,निलेश पाटील, गुरुनाथ पाटील,चरणदास म्हात्रे, विनोद मढवी, शशिकांत पाटील, उपविभाग प्रमुख समीर पाटील, सर्व शाखाप्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक(DRM) यांनी देखील दिवा स्थानकाला भेट दिली व दिवा स्थानकाची पाहणी सुद्धा केली. फलाट क्र. १ व २ वरील सरकत्या जिन्याचं काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी दिले. नवीन पुलावर नवीन तिकीट घर, एटीव्हीएम मशीनची सोय करावी अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली. फलाट क्रमांक २ वर डोंबिवली दिशेला गाडी आणि फलाट यामधील अंतर जास्त असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.



Post a Comment

Previous Post Next Post