नोव्हेंबरपासून उडणार बार!
मुंबई : तुलसी विवाह होताच इच्छुक वधू-वरांच्या लगीनघाईला सुरुवात होते. यंदा नोव्हेंबरपासून लग्नाचे बार उडणार असून नोव्हेंबरच्या तुळशी विवाहापासून तब्बल ६६ विवाह मुहूर्त आहेत. ते गतवर्षीपेक्षा अधिक महूर्त यंदा आहेत. हिंदू पंचांगानुसार, २०२२ मध्ये लग्नासाठी तब्बल ६४ शुभ मुहूर्त होते. त्यापैकी अद्याप नोव्हेंबर महिन्यासह डिसेंबर महिन्यात लग्नाचे मुहूर्त बाकी असल्यामुळे लग्नांची धामधूम दिसणार आहे.
नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत विवाहासाठी तब्बल ६६ मुहूर्त आहेत. त्यात नोव्हेंबर महिन्यात तीन मुहूर्त असून यात २७, २८, २९ या तारखेला मुहूर्त आहे. यावेळी अधिक मास असल्याने ५ महिने देवशयन राहणार आहे. त्यामुळे २९ जूननंतर थेट २३ नोव्हेंबरपासूनच विवाह आणि शुभकार्ये सुरू होतील. देवशयनपर्यंत ५२ मुहूर्त होऊन गेले आहेत. त्यानंतर जवळपास ५ महिन्यांनंतर २३ नोव्हेंबरपासून लग्नाचा दुसरा सिझन सुरू होणार आहे. त्यामध्ये १५ डिसेंबरपर्यंत नोव्हेंबर महिन्यातील ५ डिसेंबर महिन्यातील ७ असे एकूण विवाहाचे १२ मुहूर्त यंदाच्या इंग्रजी वर्ष अखेरपर्यंत आहेत.
वेगवेगळ्या पंचांगानुसार हे मुहूर्त कमी-अधिक होतात. अनेक जण आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. मंगल कार्यालये, कॅटर्स, डेकोरेशन, बुकींग करत आहेत. सध्या मुला-मुलींची सोयरिक जुळविण्यासाठी पालक व नातेवाईकांची लगबग सुरू झाली आहे. मानपान, आहेर, मंगलकार्यालय, पत्रिका, आचारी, वाहनांची बुकिंगही सुरू झाली आहे. यामुळे दिवाळीनंतर बाजारपेठेत पुन्हा गर्दी पहायला मिळणार आहे.
गोरज मुहूर्त हा सायंकाळी सूर्यास्ताच्या आसपास असतो. पाणी कमी असलेल्या भागात, तसेच अन्य काही व्यावसायिक समुदायांमध्ये गोरज मुहूर्तावरच विवाह करण्यास अनेकांची पसंती असते. त्यामुळे सायंकाळचा सोयीस्कर विवाह मुहूर्त निवडण्याचीही प्रथा आहे. यंदा १७, २४, २५, २२, २९ अशा प्रकारचे एकूण ४४ गोरज मुहूर्त आहेत. हिवाळ्यात तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्नाचा धूमधडाक्याला सुरुवात होते. यंदा नोव्हेंबर महिन्यापासूनच लग्नाचे मुहूर्त सुरू होत आहेत. गतवर्षी ५८ विवाह मुहूर्त होते. देवशयनीनंतर यंदा नवीन विवाह मुहूर्तांना प्रारंभ होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८ मुहूर्त अधिक आहेत.