हिंदू प्रथा व परंपरा पुढे नेण्याचे काम ही सर्व मंडळी करतात

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

 डोंबिवली  ( शंकर जाधव ) : आम्हा सर्वांना या सर्व पारंपरिक गोष्टींचा प्रचंड अभिमान आहे. आमच्या बरोबर असणारी ही सर्व मंडळी हिंदू सणउत्सव मोठया उत्साहात साजरा करताना दिसतात. खऱ्या अर्थाने ही प्रथा व परंपरा पुढे  नेण्याचे काम ही सर्व मंडळी करत आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत म्हणाले.

   यावेळी अखिल कोकण विकास महासंघ संस्थापक अध्यक्ष तानाजी परब, सचिव नंदकिशोर राणे, खजिनदार महेश राऊळ, महिला अध्यक्षा सरोज नेरुळकर,  सहसचिव अतुल चव्हाण, राहुल साटम, संदीप सावंत,  उमेश परब, उपाध्यक्ष हेमंत परब, अर्जुन परब, महिला संपर्कप्रमुख दिशा काटकर, रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षा परिणीती शिंदे, मुंबई शहर अध्यक्ष प्रमोद आंब्रे,  कार्याध्यक्ष मनीष दाभोळकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष,  राजेश माने, कुडाळ तालुका अध्यक्ष दादा परब आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. व्यस्त कार्यक्रम असूनही या पारंपरिक खेळाचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.नारळी पौर्णिमेनिमित्त अखिल कोकण विकास महासंघाच्या माध्यमातून पारंपारिक खेळ नारळ फोडी आणि सराव दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पश्चिम विभागात गुप्ते रोडवर दहीहंडी बांधण्यात आली होती. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आवर्जून हजर होते. तळ कोकणात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळाला जातो. बुधवारी कोकणवासीय डोंबिवलीकरांनी या पारंपरिक खेळाचा आनंद लुटला. सराव दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी दहीहंडीला सलामी दिली.

   यावेळी चव्हाण म्हणाले, ही लोकं संघटनेच्या माध्यमातून अनेक विषयाला प्राधान्य देत असतात. कोकणातील रेल्वे गाड्यांना दिवा थांबा मिळावा यासाठी अनेक वर्षे सह्यांची मोहीम केली. वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात जाऊन कार्य केलं. त्यामुळे कोकणातील रेल्वे गाड्या दिवा स्थानकात थांबा मिळत आहेत. अखिल कोकण विकास महामंडळ गेली १८ वर्षे कोकणातील पारंपारिक खेळ नारळ वाढवीने नारळी पौर्णिमेच औचित्य साधून करत आहे. पारंपारिक खेळ पहाण्यासाठी कोकणवासीयांनी खुपच गर्दी केली होती. यावेळी राजेश कदम, डॉ. सर्वेश सावंत, रामचंद्र परब, सुरेश पवार आदी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post