टिळकनगर विद्यामंदिर शाळेत साजरे झाले अनोखे रक्षाबंधन

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :   डोंबिवली शहरातील नामांकित शाळा म्हणजेच टिळकनगर विद्यामंदिर. सतत विविध उपक्रम राबवणाऱ्या या शाळेत कला या विषयाच्या तासिकेला इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींनी स्वतःचा हाताने वर्गात राख्या बनवलेल्या होत्या आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांनी भेटकार्ड बनवलेले होते की ज्यावर मुलींसाठी, आपल्या बहिणीसाठी रक्षाबंधनानिमित्त शुभ संदेश लिहिले आहेत. विद्यार्थ्यांनी आकर्षक असे ग्रीटिंग कार्डस् बनवली, तर विद्यार्थिनींनीही अत्यंत सुबक अशा राख्या बनवलेल्या होत्या. त्यानंतर वर्गांमधून मुलींनी मुलांना राख्या बांधून, तर मुलांनी मुलींना ग्रीटिंग कार्ड भेट म्हणुन देवून, नमस्कार करून अत्यंत आनंदमय वातावरणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा झाला.

रक्षाबंधनाच्या या उपक्रमातून बहिण भावाच्या प्रेमाचा शुभ संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अंगी हस्तकलेचे कौशल्य निर्माण व्हावे या हेतूने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भावाच्या हातावर बहिणीने रक्षासूत्र बांधणे म्हणजेच पुढील काळात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी भावाच्या मनगटात सतत बळ निर्माण करणे. आयुष्यात एकमेकांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे वचन म्हणजेच रक्षाबंधन. सदर उपक्रम कलेच्या शिक्षिका लिना ठाकूर आणि इतर सर्व कला शिक्षकांच्या सहकार्याने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात आला.

 डोंबिवली शहरातील नामांकित शाळा म्हणजेच टिळकनगर विद्यामंदिर. सतत विविध उपक्रम राबवणाऱ्या या शाळेत आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी कला या विषयाच्या तासिकेला इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींनी स्वतःचा हाताने वर्गात राख्या बनवलेल्या होत्या आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांनी भेटकार्ड बनवलेले होते की ज्यावर मुलींसाठी, आपल्या बहिणीसाठी रक्षाबंधनानिमित्त शुभ संदेश लिहिले आहेत. विद्यार्थ्यांनी आकर्षक असे ग्रीटिंग कार्डस् बनवली, तर विद्यार्थिनींनीही अत्यंत सुबक अशा राख्या बनवलेल्या होत्या. त्यानंतर वर्गांमधून मुलींनी मुलांना राख्या बांधून, तर मुलांनी मुलींना ग्रीटिंग कार्ड भेट म्हणुन देवून, नमस्कार करून अत्यंत आनंदमय वातावरणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा झाला. प्रसंगोपात रक्षाबंधनाच्या या उपक्रमातून बहिण भावाच्या प्रेमाचा शुभ संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अंगी हस्तकलेचे कौशल्य निर्माण व्हावे या हेतूने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे टिळकनगर शाळेचे पर्यवेक्षक यांना एन. बी. चौधरी यांना सांगितले. भावाच्या हातावर बहिणीने रक्षासूत्र बांधणे म्हणजेच पुढील काळात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी भावाच्या मनगटात सतत बळ निर्माण करणे. आयुष्यात एकमेकांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे वचन म्हणजेच रक्षाबंधन. सदर उपक्रम कलेच्या शिक्षिका लिना ठाकूर आणि इतर सर्व कला शिक्षकांच्या सहकार्याने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात आला.



Post a Comment

Previous Post Next Post