डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष व नेते अमित ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेतेआमदार प्रमोद (राजू दादा) पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्र विद्यार्थी सेना कल्याण ग्रामीण व डोंबिवली शहरने सखाराम शेठ विद्यालय काटई (कोळे )मधील ८०० शालेय विद्यार्थ्यांसाठी हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विद्यार्थ्यांना माहित व्हावा या हेतुने ऐतिहासिक असा मराठी दर्जेदार 'सुभेदार'चित्रपटाचे आज मंगळवार २९ तारखेला पी.व्ही. आर. सिनेमा, पलावा येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, मनविसे जिल्हा सचिव प्रितेश पाटील, शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, माजी सरपंच संदप गाव योगेश पाटील, शहर सचिव गणेश कदम, विभाग अध्यक्ष रोहीत भोईर, मनविसे शहर सचिव प्रितेश म्हामुणकर, उपशहर अध्यक्ष सुहास काळे, प्राजक्ता देशपांडे, यतिन पाडगावकर, विभाग अध्यक्ष कुणाल मोर्ये, निषाद अंबुर्ले, प्रवीण बोरहाडे विभाग सचिव ऋतुजा खोत, व के.व्ही. पेंढरकर, मंजूनाथ, मढ़वी महाविद्यालयाचे सर्व यूनिट पदाधिकारी उपस्थित होते.चित्रपट पाहून विद्याथीही आनंदी झाले.