ऑडी इंडियाकडून ई-ट्रॉनची नवीन श्रेणी लाँच


ऑडी


क्‍यू८ ई-ट्रॉन आणि क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉन लाँच केली 

मुंबई : ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज नवीन ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन तिच्‍या जागतिक लाँचच्या काही महिन्‍यांनंतर भारतात लाँच केली. चार व्‍हेरिएण्‍ट्स ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन त्‍यांच्‍या सुधारित ड्रायव्हिंग वैशिष्‍ट्यांसह स्‍वप्‍नवत ड्राइव्‍हचा अनुभव देतात. ११४ केडब्‍ल्‍यू बॅटरी (विभागामध्‍ये सर्वात मोठी) असलेल्‍या ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन एकाच चार्जमध्‍ये (डब्‍ल्‍यूएलटीपी प्रमाणित) जवळपास ६०० किमीपर्यंतची इंडस्‍ट्री-बेस्‍ट ड्रायव्हिंग रेंज देतात. ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन एकाच चार्जमध्‍ये (डब्‍ल्‍यूएलटीपी प्रमाणित) जवळपास ५०५ किमीची ड्रायव्हिंग रेंज देतात.

ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉनमध्‍ये नवीन डिझाइनसह लक्‍झरीअस आरामदायीपणा, सुधारित कार्यक्षमता, सर्वात मोठ्या बॅटऱ्या आणि सुधारित ड्राइव्‍ह रेंज आहे, जे ई-ट्रॉनचा वारसा व यशाला पुढे घेऊन जातात. या लाँचसह ऑडीने नवीन कॉर्पोरेट ओळख देखील निर्माण केली आहे, जेथे चार रिंग्‍सची नवीन, द्विमितीय डिझाइन लक्‍झरी गतीशीलतेसह शाश्‍वततेची खात्री देते.

ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉनची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ११,३७०,०००, १२,६१०,०००, ११,८२०,००० आणि १३,०६०,००० रुपये आहे. 

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, "आज आम्‍ही आमच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या प्रवासामध्‍ये आणखी एक पाऊल उचलत आहोत. आम्‍हाला या आकर्षक इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्‍याचा अधिक आनंद होत आहे. सर्वात मोठे बॅटरी पॅक्‍स अतिरिक्‍त रेंज देण्‍यासह मॉडेल्‍सच्‍या मूल्‍य तत्त्वामध्‍ये देखील वाढ करतात. नवीन उत्‍साहवर्धक स्‍टायलिंग रचनेमधील सुधारणांशी पूरक आहे आणि निश्चितच सर्वांचे लक्ष वेधून घेईल. ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन आमच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता धोरणामध्‍ये प्रमुख वेईकल आहे आणि आम्‍ही आमच्‍या लाइन-अपला इलेक्ट्रिफाईंग करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना आम्‍हाला निर्मितीसाठी प्रबळ पाया देते. नवीन ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉनच्‍या सादरीकरणासह आमचा आता विभागामध्‍ये व्‍यापक ईव्‍ही पोर्टफोलिओ आहे."


वैशिष्‍ट्ये:

ड्राइव्‍ह व कार्यक्षमता:

  •  पुढील व मागील बाजूस इलेक्ट्रिक मोटर्ससह ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन ४०८ एचपी शक्‍ती आणि ६६४ एनएम टॉर्कची निर्मिती करतात. 
  • ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन ३४० एचपी शक्‍ती आणि ६६४ एनएम टॉर्कची निर्मिती करतात.
  •  ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन फक्‍त ५.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करतात, तर ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉनला यासाठी ६.० सेकंद घेतात. 
  •  या कार्समध्‍ये आयकॉनिक ई-क्‍वॉट्रा ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह सिस्‍टमसह ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍टशी संलग्‍न तीन मोड्स: ऑटो, डायनॅमिक व ऑफ-रोड आहेत. 
  • नवीन प्रोग्रेसिव्‍ह स्टिअरिंग कमी प्रयत्‍नामध्‍ये अचूक कॉर्नरिंग व स्टिअरिंग वापराची आणि अधिक फिडबॅक देते.
  • अॅडप्टिव्‍ह एअर सस्‍पेंशन अॅडजस्‍टेबल राइड हाइटसह प्रदान करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन सर्व प्रदेशांमध्‍ये ड्राइव्‍ह करण्‍यासाठी अनुकूल आहे. 
  •  ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍टसह सात ड्राइव्‍ह मोड्स ड्रायव्‍हरला एकाच क्लिकमध्ये ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉनच्‍या ड्रायव्हिंग गतीशीलतेमध्‍ये बदल करण्‍याची सुविधा देतात. 
  •  या कार्समध्‍ये २२६ मिमीचे (बेस्‍ट-इन-क्‍लास) अधिकतम ग्राऊंड क्‍लीअरन्‍स आहे, ज्‍यामुळे या कार्स खडतर प्रदेशांमध्‍ये सहजपणे ड्राइव्‍ह करता येऊ शकतात.


 कार्यक्षमता व चार्जिंग: 

 ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन अनुक्रमे जवळपास ५८२ किमी आणि ६०० किमीची रेंज (डब्‍ल्‍यूएलटीपी प्रमाणित) देतात, ज्‍याचे श्रेय त्‍यांच्‍या विस्‍तारित ११४ केडब्‍ल्‍यूएच (बेस्‍ट-इन-इंडस्‍ट्री) लिथियम-आयन बॅटऱ्यांना जाते. यामुळे या कार्स लांबच्‍या प्रवासासाठी अनुकूल आहेत.

 ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन या दोन्‍ही कार्समध्‍ये ९५ केडब्‍ल्‍यूएच लिथियम-आयन बॅटरी आहे, जी अनुक्रमे जवळपास ४९१ किमी व ५०५ किमीची रेंज (डब्‍ल्‍यूएलटीपी प्रमाणित) देते.

 जवळपस २२ केडब्‍ल्‍यू एसी व १७० केडब्‍ल्‍यू डीसीपर्यंत चार्जिंग उपलब्‍ध आहे (बेस्‍ट-इन-क्‍लास). 

 सुलभ पार्किंग आणि सहज वापरासाठी दोन्‍ही बाजूंना चार्जिंग सॉकेट्स देण्‍यात आले आहेत. 

 पॅडल शिफ्टर्सद्वारे एमएमआय मॅन्‍युअल सिलेक्‍शन करत रिकपरेशनच्‍या तीन पातळ्या ऑटोमॅटिक मोड किंवा मॅन्‍युअलमध्‍ये सेट करता येऊ शकतात. 

 चार्जिंग वेळ २६ मिनिटांमध्‍ये २० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत. 

 चार्जिंग वेळ ३१ मिनिटांमध्‍ये १० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत. 

 'मायऑडी कनेक्‍ट' अॅपचा भाग म्‍हणून संपूर्ण भारतातील १००० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट ऑपरेटर्सकडे एक वर्षापर्यंत ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन ग्राहकांसाठी कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी चार्जिंग सुविधा.




 

Post a Comment

Previous Post Next Post