दिवा : काल दिव्यातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठान या संघटनेने अंबरनाथ तालुक्यामधील वाकड्याची वाडी या आदिवासी पाड्यावर जाऊन "एक हाथ मदतीचा" हा उप्रकम मोठ्या आनंदात पार पाडला. या उपक्रमात चटई, कडधान्य, बिस्कीटे, बॅंकेट, कपडे, साड्या, लहान मुलांचे कपडे अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि वैद्यकीय शिबिर त्यावेळी राबविण्यात आले. जवळपास ५०० लहान मोठ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. वैद्यकीय शिबिर राबविताना डॉ. पराग जोशी, डॉ. दिनेश थोरात, डॉ. दत्तात्रय मेमाने आणि डॉ. प्रफुल्ल सोनवणे यांचा सिंहाचा वाटा होता. या आरोग्य शिबिरात बीपी, मधुमेह, बाकी आजारावर लहान मुलांना पासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा तेथे चेकअप केला गेला. तसेच मोफत औषधे वाटप ही केली गेली.
श्रीमंतयोगी प्रतिष्ठान, दिवा ही संस्था गेल्या 7 वर्षांपासून समाजसेवा करत आहे. आपण ही समाजाचे एक भाग आहोत, ही जाणीव ठेऊन या संस्थेतील प्रत्येक जण समाजसेवेसाठी पुढाकार घेत असतो. या संस्थेचे आधारस्तंभ शशिकांत पाटील, अध्यक्ष अरविंद उभारे,उपाध्यक्ष अजय चव्हाण, सचिव राहुल कानस्कर,उपसचिव सुधाकर हर्णेकर, खजिनदार संकेश भावे, उपखजिनदर अनिल करकरे, दिनेश सावंत, तुकाराम उंढरे, संभाजी कणसे, कृष्णा चौगुले, संदीप वारांग, दत्ताराम कोशिमकर, ऋषी सुर्वे, रुपेश दुखंडे, महेश साटम, विवेक पाटील, अरविंद घोगळे, गणपत साळुंखे, सुनिल शिर्के, मंगेश लाड, रोहिदास कठे असे अनेक सदस्य कालच्या उपक्रमाला आवर्जून हजर राहून पुन्हा एकदा हा उपक्रम यशस्वी करून दाखवला.
हे करताना प्रखरतेने जे नाव घ्यायचे असेल ते म्हणजे शिवभक्त अनाथ आश्रम शाळा, लव्हाळी, बदलापूर याचे सर्वेसर्वा रमेश बुटरे सर यांच्या पाठिंब्या शिवाय हे करणे अशक्य होते. या उपक्रमाला ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावला, त्या सेवा मोठ्या मनाच्या आणि सामाजिक बांधिलकी सांभाळणाऱ्या सर्व मित्र परिवारांनी मदत केली त्यांचे ही श्रीमंतयोगी प्रतिष्ठान आभार मानले.