पहिली कौटुंबिक ई-स्‍कूटर इब्‍लू फिओ लाँच

 


गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा ईव्‍ही दुचाकी विभागामध्‍ये प्रवेश

मुंबई, : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने भारतातील पहिली कौटुंबिक ई-स्‍कूटर इब्‍लू फिओच्‍या लाँचची घोषणा केली. भारतातील ईव्‍ही दुचाकी विभागामधील कंपनीचे हे पहिले उत्‍पादन आहे. इब्‍लू फिओच्‍या प्री-बुकिंग्‍जना १५ ऑगस्‍ट २०२३ रोजी सुरूवात झाली आणि डिलिव्‍हरींना २३ ऑगस्‍ट २०२३ पासून सुरूवात होईल.

ही स्‍कूटर सिंगल व्‍हेरिएण्‍टमध्‍ये सादर करण्‍यात येईल आणि ग्राहकांसाठी किंमत ९९,९९९ रूपये असेल. कंपनी सध्‍या देशात इब्‍लू रोझी (ईव्‍ही तीन-चाकी - एल५एम), इब्‍लू स्पिन आणि सायकल्‍सची इब्‍लू थ्रिल (ई-बायसिकल) श्रेणीची विक्री करत आहे.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्‍हणाले, "इब्‍लू फिओ कंपनीच्‍या रायपूर येथील केंद्रामध्‍ये स्‍क्रॅचमधून डिझाइन करण्‍यात आली आहे. या स्‍कूटरमध्‍ये कालातीत डिझाइन आणि उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा आहे. ही आकर्षक दरामध्‍ये कार्यक्षमता व सुरक्षिततेचे संयोजन असलेली कुटुंब-केंद्रित स्‍कूटर आहे. ईव्‍ही दुचाकी विभागातील प्रवेशासह गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स भारतातील गतशीलतेच्‍या भावी पिढीप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करेल."

ते पुढे म्‍हणाले, "आम्‍हाला आमच्‍या विद्यमान ईव्‍ही पोर्टफोलिओला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद होत आहे. भारतभरातील प्रबळ रिटेल नेटवर्कसह आम्‍ही व्‍यापक ग्राहकवर्गाच्‍या मागण्‍यांची पूर्तता करू. भारतात गेल्‍या काही वर्षांमध्‍ये ईव्‍ही दुचाकी विभागाने उल्‍लेखनीय प्रगती केली आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, इब्‍लू फिओ कुटुंबांच्‍या आणि भावी पिढीतील ग्राहकांच्‍या अपेक्षा व महत्त्वाकांक्षांची पूर्तता करेल."

इब्‍लू फिओची वैशिष्‍ट्ये:

कार्यक्षमता:

 २.५२ केडब्‍ल्‍यू लि-आयन बॅटरी व्‍यापक शक्‍तीसाठी ११० एनएम सर्वोच्‍च टॉर्कची निर्मिती करते.

 तीन ड्रायव्हिंग मोड्स: इकॉनॉमी, नॉर्मल व पॉवर राइडरच्‍या ड्रायव्हिंग स्‍टाइलशी अनुकूल आहेत आणि ई-स्‍कूटरच्‍या विशिष्‍टतेमध्ये अधिक भर करतात.

 विनसायास प्रवासासाठी एकाच चार्जमध्‍ये आरामदायी ११० किमीची रेंज.

 लांबच्‍या प्रवासादरम्‍यान आरामदायी प्रवासासाठी ६० किमी/तासची अव्‍वल गती.

 बॅटरीवरील ताण कमी करण्‍यासाठी आणि ड्रायव्हिंग रेंज वाढवण्‍यासाठी रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग.

आकारमान:

 १८५० ची लक्षणीय लांबी इब्‍लू फिओला आकर्षक उपस्थिती देते.

 उंच प्रवाशांना सामावून घेण्‍यासाठी ११४० मिमी उंची.

 फॅमिली स्‍कूटरला साजेसे १३४५ मिमी व्‍हीलबेस.

 रस्‍त्‍यांवरील अडथळे व चढ-उतारांचा सामना करण्‍यासाठी १७० मिमी ग्राऊंड क्‍लीअरन्‍स.


एक्‍स्‍टीरिअर:

 पाच लक्षवेधक रंग: सियान ब्‍ल्‍यू, वाइन रेड, जेट ब्‍लॅक, टेलि ग्रे, ट्रॅफिक व्‍हाइट.


 आरामदायी राइडसाठी टेलिस्‍कोपिक फ्रण्‍ट संस्‍पेशन आणि ड्युअल ट्यूब ट्विन शॉकर.

 सर्वोत्तम प्रवासी सुरक्षिततेसाठी फ्रण्‍ट व रिअरमध्‍ये सीबीएस डिस्‍क ब्रेक.

 रात्रीच्‍या वेळी खात्रीदायी ड्रायव्हिंगसाठी हाय-रिझॉल्‍युशन एएचओ एलईडी हेडलॅम्‍प्‍स आणि एलईडी टेल लॅम्‍प्‍स.

 साइड स्‍टॅण्‍डमध्‍ये सेन्‍सर इंडिकेटर आहे.

 पुढील व मागील बाजूस १२-इंच इंटरचेंजेबल ट्यूबलेस टायर्स.

वैशिष्‍ट्ये व आरामदायीपणा:

 आरामदायी प्रवासासाठी एर्गोनॉमिकली डिझाइन केलेली सीट.

 नेव्हिगेशनसाठी ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी.

 गॅस सिलिंडर वाहून नेण्‍यासाठी एैसपैस व्‍यापक फ्लोअरबोर्ड.

 सोईस्‍कर बॉक्‍ससह सुलभ स्‍टोरेज.

 मोबाइल चार्जिंग पॉइण्‍टवर चालता-फिरता फोन चार्ज करण्‍याची सुविधा.

 ७.४ इंच डिजिटल फुल कलर डिस्‍प्‍लेसह वेईकलची माहिती, ज्‍यामध्‍ये सर्विस अलर्ट, साइड स्‍टॅण्‍ड सेन्‍सर, ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी, नेव्हिगेशन असिस्‍टण्‍ट,

इनकमिंग मॅसेज अलर्ट, कॉल अलर्ट, मोड्स डिस्‍प्‍ले, रिव्‍हर्स इंडिकेटर, बॅटरी एसओसी इंडिकेटर, थ्रॉटल फॉल्‍ट सेन्‍सर, मोटर फॉल्‍ट सेन्‍सर, बॅटरी अलर्ट आणि हेल्‍मेट इंडिकेटरचा समावेश आहे.

चार्जिंग:

 होम चार्जरची ६० व्‍होल्‍टची क्षमता.

 चार्जिंग वेळ: ५ तास २५ मिनिटे.

वॉरण्‍टी आणि फायनान्सिंग:

 कंपनी ३ वर्ष आणि ३०,००० किमी वॉरंटी प्रदान करेल.

 आयडीबीआय बँक, एसआयडीबीआय, बजाज फिनसर्व्‍ह, कोटक महिंद्रा बँक, पेटेल, ईजीफायनान्‍स, छत्तीसगड ग्रामीण बँक, रेव्‍हफिन, अमू लीजींग प्रा. लि. आणि पैसेलो अशा आघाडीच्‍या संस्‍थांसोबत आर्थिक सहयोगांच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना सोयीसुविधा.

Post a Comment

Previous Post Next Post