पेटीएमचे फ्रीडम ट्रॅव्हल कार्निव्हल

 


 विमान तिकिटांवर मिळणार आकर्षक सवलती

मुंबई : पेमेंट्स आणि वित्तीय सेवा पुरवणाऱ्या व क्‍यूआर व मोबाइल पेमेटंसचा पाया रचणाऱ्या पेटीएम या भारताच्या अग्रगण्य ब्रॅण्डची मालक कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पेटीएम फ्रीडम ट्रॅव्हल कार्निव्हलची घोषणा केली आहे. १० ऑगस्ट पर्यंत चालणा-या या कार्निव्हलमध्ये यूजर्सना स्वातंत्र्यदिनाच्या मोठ्या वीकेंडमध्ये पेटीएम अॅपच्या मध्यमातून विमान, ट्रेन आणि बस तिकिट्सच्या बुकिंगवर आकर्षक सवलती मिळणार आहेत.

पेटीएमकडून आरबीएल बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या ऑफर्सच्या माध्यमातून डोमेस्टिक फ्लाइट्सच्या तिकिटांवर फ्लॅट १५ टक्क्यांची तर आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सच्या तिकिटांवर फ्लॅट १० टक्क्यांची झटपट सूट दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून पेटीएम वॉलेट आणि पेटीएम पोस्टपेडच्या माध्यमातून केलेल्या डोमेस्टिक फ्लाइट्सच्या बुकिंगवर फ्लॅट १२ टक्‍के सवलतही दिली जाणार आहे. या योजनेत इंडिगो, विस्तारा, स्पाइसजेट, एअरएशिया, आकासा एअर आणि एअर इंडिया या सर्व प्रमुख विमानकंपन्यांचा सहभाग असल्याने यूजर्सना तिकिटांच्या बुकिंगवर अधिकाधिक बचत करता येणार आहे. कंपनीद्वारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सशस्त्र बलांतील कर्मचाऱ्यांनाही विशेष दरात प्रवासभाडे दिले जात आहे. अधिक बचत करण्यासाठी यूजर्स झीरो कन्व्हिनिएन्स शुल्कासह आपले विमानतिकिट बुक करू शकणार आहेत.

बस तिकिटांसाठी पेटीएम कडून २५ टक्‍के झटपट सवलत दिली जात आहे, ज्यासाठी ‘क्रेझी सेल' (CRAZYSALE) हा कोड वापरायचा आहे व विशिष्ट ऑपरेटर्सच्या तिकिटांवर २० टक्‍के अतिरिक्त सवलतही मिळणार आहे. पेटीएमच्या बेस्ट प्राइम गॅरंटीज योजनेअंतर्गत २,५०० हून अधिक बस ऑपरेटर्सच्या बस तिकिटांवर सर्वात स्वस्त तिकिटदरांची हमी कंपनीकडून देण्यात येत आहे.

यूपीआय पेमेंटद्वारे केलेल्या ट्रेन तिकिटांच्या बुकिंगवर पेटीएम कडून शून्य शुल्क आकारले जात आहे. पेटीएम अॅपवर यूजर्सना आपल्या बुकिंगचा PNR स्टेटस तपासता येतो, ट्रेन्सचे लाइव्ह ट्रॅकिंग करता येते आणि ट्रेनप्रवासाशी संबंधित सर्व चौकशांसाठी २४X७ ग्राहकसेवा उपलब्ध असते.

याखेरीज विमान, बस आणि ट्रेन तिकिट कोणतेही कारण न देता रद्द करण्याची ‘मोफत कॅन्सलेशन’ची सोयही पेटीएम द्वारे दिली जात आहे, ज्यामुळे तिकिट रद्द करताना कॅन्सलेशनपोटी कोणतेही छुपे शुल्क भरावे न लागता तिकिटाची १०० टक्‍के रक्कम यूजर्सच्या मूळ खात्यात जमा होऊ शकणार आहे. ‘मोफत कॅन्सलेशन’ अंतर्गत कंपनीने यूजर्सच्या हाती किमान प्रिमियम भरण्याची सोय दिली आहे. प्रवासाचा बेत पूर्णपणे निश्चित नसेल तर तिकिटांचे बुकिंग करताना यूजर्स ही सेवा निवडता येणार आहे.

पेटीएमद्वारे पेमेंटच्या माध्यमांचे लवचिक पर्याय पुरविले जातात, त्यामुळे यूजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, नेटबँकिंग, डेबिट कार्डस् आणि क्रेडिंट कार्डस् यांच्याद्वारे तिकिटांचे पैसे भरता येतात. प्रवासाच्या बुकिंग्जसाठी या कंपनीच्या सेवेला यूजर्सकडून प्राधान्य दिले जाते आणि ही कंपनी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची अधिस्वीकृत ट्रॅव्हल एजंट आहे. कंपनीद्वारे मोफत कॅन्सलेशन, रिफंड्स आणि प्रवास विम्यासह विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post