डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रचंड असुविधांमुळे शेतकरी, व्यापारी, माथाडी, हमाल व ग्राहक यांनी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात शनिवार दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंदची हाक दिली होती. बाजार आवारातील पाहणी दौऱ्याच्या दरम्यान माजी आमदार पवार यांनी विद्यमान संचालक मंडळ व प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारा विरोधात प्रचंड संताप व्यक्त करीत विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. यानंतर संचालक मंडळा व बाजार समिती प्रशासनाने तातडीने आमदार पवार यांच्या नेतृत्वात व्यापारी, माथाडी व इतर घटकांची ४ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजता सभागृहात बैठक घेतली. या दरम्यान व्यापारी, माथाडी व इतर सर्व घटकांच्या सर्व मागण्या येत्या १५ दिवसात पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर हा लाक्षणिक बंद तात्पुरता २० ऑगस्ट २०२३ पर्यंत मागे घेत असल्याची घोषणा आमदार पवार यांनी सदर बैठकी दरम्यान केली. येत्या १५ दिवसात मागण्यापूर्ण घेऊन अपेक्षित बदल न झाल्यास आदोलन अधिक तीव्र करू असा सज्जड धमकीवजा इशारा आमदार पवार यांनी यावेळी आपल्या निवेदनात विद्यमान संचालक मंडळ व प्रशासनाला दिला.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र चिखल, घाण, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची दुरावस्था, व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्याचप्रमाणे बाजार समितीमध्ये अनधिकृत गाळे बांधून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याच्या तक्रारी बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, माथाडी, हमाल व ग्राहक यांनी कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारीनुसार आमदार यांनी मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पाहणी दौरा केला. यावेळी तेथील अनागोंदी कारभार पाहून बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करा व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार आहे. तसेच या कारभारा विरोधात ५ ऑगस्ट रोजी आमदार पवार यांच्या नेतृत्वात मार्केट लाक्षणिक कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा शेतकरी, व्यापारी, माथाडी व हमाल यांनी केली होती. दरम्यान यानंतर खडबडून जागे झालेल्या संचालक मंडळ व प्रशासनाने आपल्या सभागृत तातडीने शेतकरी, व्यापारी, माथाडी, हमाल आदी घटकांची माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतुत्वात बैठक घेतली. या बैठकीत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील असुविधांवर चर्चा करीत येत्या १५ दिवसात सर्व कामे मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन माजी आमदार नरेंद्र पवार व सर्व घटकांना दिले. याचर्चे अंती ५ ऑगस्ट २०२३ रोजीचा एक दिवसाचा लाक्षणिक बंद २० ऑगस्ट २०२३ पर्यंत तात्पुरता स्थगित करण्याची घोषणा आमदार पवार यांनी यावेळी केली. येत्या १५ दिवसात बाजार आवारातील परिस्थिती न बदलल्यास आदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आमदार पवार यांनी यावेळी दिला. या बैठकीला व्यापारी प्रतिनिधी तथा संचालक मोहन नाईक, फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघाचे अध्यक्ष इक्बाल मेमन, उपाध्यक्ष कमरुद्दीन शेख, कार्याध्यक्ष गणेश पोखरकर, धान्य मार्केटचे ज्येष्ठ व्यापारी वसंतभाई डेढीया, नरेंद्र परमार, होलसेल मर्चंट असो. चे अध्यक्ष सदाशेठ टाकळकर, ज्येष्ठ व्यापारी सय्यद कासम, शफीक बागवान, चक्रधर येवले, जयप्रकाश गुप्ता, बाळासाहेब करंडे, सुखदेव करंडे, सुशील येवले, कांदा बटाटा असो. पदाधिकारी विलासशेठ पाटील, गिरीश पाटील, फूल मार्केटचे व्यापारी भाऊ नरवडे, अतुल धुमाळ, सचिन सैद, भाजीपाला व्यापारी उमाशंकर वैश्य, शंभु गुप्ता, अमरजीत गुप्ता, राम पोखरकर, शांताराम ढोबळे, दत्ता बारवे, निवृत्ती खरमाळे, प्रफुल्ल घोणे, अभिजित तांबे आदी उपस्थित होते.