- ५५८० चौ. फूट क्षेत्रफळात कार्यालय असणार
- १ ऑक्टोबरपासून टेस्लाचे कार्यालय सुरू होणार
पुणे: उद्योगपती इलॉन मस्क यांनी टेस्लाच्या कार्यालयासाठी पुण्यात जागा घेतली आहे. पुण्यातील विमाननगर भागातील पंचशील बिझनेस पार्कमध्ये कार्यालयासाठी भाड्याने जागा घेण्यात आली आहे. या जागेचे मासिक भाडे ११.६५ लाख रुपये असणार आहे. तसेच वार्षिक आधारावर या लीजच्या रकमेत वाढ होणार आहे. १ ऑक्टोबरपासून टेस्लाचे कार्यालय सुरू होणार आहे.
पुण्यातील विमाननगर भागात पंचशील बिझनेस पार्क ही मोठी इमारत असून या इमारतींमध्ये टेस्ला व्यतिरिक्त इतरही मल्टीनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस आहेत. टेस्लाला जागतिक दर्जाचे निकष देण्यासाठी महाराष्ट्रात कार्यालय हवे होते, त्यासाठी टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जागा भाडेतत्वावर खरेदीचा हा निर्णय घेतला आहे.
टेस्लाची भारतातील सहाय्यक कंपनीकडून पाच वर्षांसाठी आँफिससाठी लीजवर जागा खरेदीचा निर्णय घेतला आहे. टेस्लाने पंचशील बिझनेस पार्कच्या बी विंगममधील पहिल्या मजल्यावर ५५८० चौ. फुट क्षेत्रफळात आँफिसची जागा निश्चित केली आहे. ही डील टेबलस्पेस टेक्नाॅलाॅजीज प्रायव्हेट लिमिटेडसह झाली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये वार्षिक ५ टक्के भाडे वाढीसह ३६ महिन्यांच्या लाॅक इन कालावधीवर सहमती झाली आहे, गरज पडल्यास टेस्ला पुढील पाच वर्षांपर्यंत लीजमध्ये वाढ करू शकते. या करारानुसार भाडेकरारात पाच कार आणि 10 दुचाकी पार्किंगचा समावेश असेल.