डोंबिवली ( शंकर जाधव ) : लोकमान्य टिळकांनी सामाजिक उद्देश समोर ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला.सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खारीचा वाटा म्हणून सामाजिक उपक्रम राबवीत असतात. डोंबिवली पश्चिमेकडील अचानक मित्र मंडळ गेली ३२ वर्ष गणेशोत्सवात साजरा करत आहेत.यंदाच्या गणेशोत्सवात रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्सच्या सहकार्याने अचानक मित्र मंडळाचा `ज्ञान पेटी` उपक्रम राबविला. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत होऊन शालेय साहित्य `ज्ञान पेटी` टाकावे असे भक्तांना सांगितले जाते. दहा दिवसानंतर `ज्ञान पेटी` जमलेले शालेय साहित्य आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना दिले जाते,जेणेकरून त्याच्या शिक्षणात अडचण येऊ नये असे मंडळाचे अध्यक्ष सुजित महाजन यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील अचानक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवात अध्यक्ष सुजित महाजन, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष सतीश सोनावणे, खजिनदार राजू म्हात्रे, हिशोब तपासनीस श्रीकांत बिरमोळे,सुनील म्हात्रे, निखील शेलार, संदीप कदम, सुधीर शेट्टी, अमोल जाधव, अमित ठक्कर, साहिल चौधरी, यश खेडेकर, अमित रेडेकर,संदेश राणे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेतात.या दहा दिवसात भक्तांची मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी केली जाते. महिलांसाठी होम मिनिस्टर मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा विशेष म्हणजे `ज्ञान पेटी` हा शालेय विद्यार्थ्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. गणपती बाप्पाच्या मूर्ती जवळ रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्सच्या सहकार्याने अचानक मित्र मंडळाचा `ज्ञान पेटी` ठेवण्यात आली आहे. गणेश भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर या `ज्ञान पेटी` शालेय साहित्य ठेवावे अशी विनंती केली जाते. भक्तांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत वह्या, पेन, पेन्सिल,कंपास पेटी,पुस्तक ठेवली. गणेशोत्सव नंतर मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदिवासी पाड्यात जाऊन येथील विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य देतात.डोंबिवली शहर हे सांकृतिक शहर म्हणून ओळखले जाते.आपले शहर स्वच राहावे म्हणून कचरा वगीर्करणकरूनच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या घंटागाड्यात टाका. शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी आपली वाहने योग्य ठिकाणी पार्किंग करा असा संदेश अध्यक्ष महाजन यांनी दिला.