डोंबिवली ( शंकर जाधव ) : गणेशोत्सव सुरू असताना मुसळधार पावसाने जोर धरल्याचे दिसते. विजेच्या कडकडासह मुसळधार पावसामुळे डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसर जलमय झाला तर पश्चिमेकडील उमेशनगरातही गुडघाभर पाणी साचले होते. स्टेशन परिसरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांनी काही वेळ दुकाने बंद ठेवली होती. सायंकाळची वेळ असल्याने नोकरदार वर्गाला लोकलमधून प्रवास करताना इतर दिवसांपेक्षा जास्त गर्दीचा सामना करावा लागला.पालिकेचे कर्मचारी ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाहणी करत होते.तर पालिकेचे आपतकालीन विभागाचे कर्मचारीही सज्ज होते.
ठाणे शहरात बुधवारी सायंकाळी ३.३० ते ४.३० वाजेपर्यंत ८. १३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसर जलमय झाला तर पश्चिमेकडील उमेशनगरातही गुडघाभर पाणी साचले होते. स्टेशन परिसरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांनी काही वेळ दुकाने बंद ठेवली होती. सायंकाळची वेळ असल्याने नोकरदार वर्गाला लोकलमधून प्रवास करताना इतर दिवसांपेक्षा जास्त गर्दीचा सामना करावा लागला.पालिकेचे कर्मचारी ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाहणी करत होते. तर पालिकेचे आपतकालीन विभागाचे कर्मचारीही सज्ज होते.
कल्याण शहरातील शिवाजी चौकात पाणी साचले होते आणि कल्याण स्थानक परिसरात पाणी साचले. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे सर्वच शहरांमधील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होती. घोडबंदर, माजिवडा, मुंबई-नाशिक महामार्ग तसेच शिळफाटा येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले. काही दिवसापासून दांडी मारलेल्या पावसाने आज कल्याण मुंबई परिसरात जोरदार हजेरी लावली असून विजेच्या कडकडे कोसळणाऱ्या संसाधन पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहे. कल्याण शिवाजी चौकात मुसळधार पावसामुळे मोठे प्रमाणात पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला वाहने चाले लागत आहे तर दुसरीकडे कल्याण पश्चिम येथील मोहन सृष्टी परिसर जलमय झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी साचल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली आहे तर दुसरीकडे सखलभागातही लोकांच्या घरात पाणी साचणे सुरुवात झालेली आहे.