दिवा ( आरती मुळीक परब) : शिवसेना दिवा शहर महिला आघाडीच्या अर्चना निलेश पाटील आयोजित राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी मुली वाचवा, मुली जगवा असा सामाजिक संदेश दिला. दिव्यात मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली सदर राज्यस्तरीय भव्य मंगळागौर स्पर्धा शिवसेनेच्या अर्चना निलेश पाटील यांच्यातर्फे आकांक्षा हॉल सभागृहात संपन्न झाल्या. स्पर्धेच्या संयोजिका किरण संतोष शितकर असून या स्पर्धेत महिलांचे एकूण सतरा ग्रुप सहभागी झाले होते.
या स्पर्धेत प्रथम विजेत्या अष्टभुजा ग्रुप (ठाणे) ला २१ हजार रोख व चषक, दुसरे पारितोषिक माऊली ग्रुप (ऐरोली) यांनी ११ हजार रोख व चषक तर सहयोग ग्रुप (घाटकोपर) यांनी ७ हजार रोख व चषक पटकवले तर उत्तेजनार्थ मुब्रा देवी ग्रुप (दिवा), नारीशक्ती ग्रुप (ऐरोली), करनिवासिनी ग्रुप (घाटकोपर), रिद्धी सिद्धी ग्रुप (दिवा), देवी सातेरी भावई ग्रुप (दिवा) यानी मिळवले.
याप्रसंगी मान्यवर माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, उपशहरप्रमुख अॅड. आदेश भगत, तसेच माजी नगरसेविका दिपाली भगत व दर्शना म्हात्रे व शिवसेना युवती प्रमुख साक्षी मढवी, सरीता रमाकांत मढवी, सविता विनोद मढवी, मेघा शशिकांत पाटील, विभागप्रमुख उमेश भगत, गुरुनाथ पाटील, भालचंद्र भगत, शशिकांत पाटील, निलेश बाळाराम पाटील, सूर्यकांत कदम, वैशाली इंदुलकर यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.



